सोमवारी (९ मे) आयपीएलच्या मैदानात मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आमना- सामना झाला. कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना १६५ धावा केल्या आणि मुंबईला १६६ धावांचे आव्हान दिले. यावेळी फलंदाजीला आलेल्या मुंबईच्या डावातील पहिल्यात षटकात रोहित शर्मा याच्या रूपात संघाला पहिला झटका मिळाला. रोहितने विकेट गमावली खरी, पण त्याच्या या विकेटमुळे सोशल मीडियावार चांगलाच वाद पेटला. पंचांनी ज्या पद्धतीने रोहितला बाद करार दिला, त्याविषयी नेटकरी शंका उपस्थित करत आहेत.
झाले असे की, मुंबईच्या डावातील पहिले षटक टीम साऊदी (Tim Southee) घेऊन आला होता. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडूवर रोहित शर्मा (Rohit Sharma) यष्टीरक्षक शेल्डन जॅक्सनच्या हातात झेलबाद झाला. चेंडू रोहितच्या बॅटला लागल्याचे जाणवले आणि केकेआरच्या संपूर्ण संघाने विकेटसाठी अपील केली. परंतु मैदानातील पंचाने त्याला बाद करार दिला नाही. यानंतर केकेआरचा कर्णधार श्रेयस अय्यरने डीआरएस घेतला आणि त्यानंतर तिसऱ्या पंचाने मात्र रोहितला बाद घोषित केले. या घटनाक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांकडून व्हायरल केले गेले आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
डीआरएल घेतल्यानंतर जेव्हा रिप्ले पाहिला गेला, तेव्हा असे दिसले की, चेंडू रोहितच्या बॅटला लागण्याआधीच स्निको मीटरमध्ये हलकासा आवाज आला होता. तसे पाहिले, तर चेंडू बॅटला लागल्यानंतर या मीटरमध्ये हालचाल दिसली पाहिजे, पण रोहितच्या बाबतीत काहीतरी गडबड असल्याचे दिसले. याच कारणास्तव त्याचे चाहते पंचांच्या निर्णयावर शंका उपस्थित करत आहेत. रोहित शर्मा स्वतः देखील पंचांच्या या निर्णयानंतर हैराण होता. काही वेळ तो खेळपट्टीवर उभा राहिला, पण नंतर त्याला मैदान सोडावे लागले. सोशल मीडियावर याविषयी वातावरण चांगलेच तापले आहे.
एका युजरने रागाने लालबुंद झालेल्या चेहऱ्याच्या इमोजीचा समावेश करत लिहिले की, “पंचांचा चुकीचा निर्णय. रोहित स्पष्टपणे नाबाद होता.”
https://twitter.com/talk_mayank/status/1523699906162327552
दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “मला वाटते की, पंचांना थ्रीडी ग्लासची गरज आहे.”
https://twitter.com/TrendsRohit/status/1523699364979306497?s=20&t=P2CmVjWxD06wQi8nN71SCw
Spike was there even before the ball passed the bat, Umpire ????#MIvsKKR pic.twitter.com/lwbLRI7V7n
— Alka???? (@Its_Alka) May 9, 2022
https://twitter.com/whokumarrohit/status/1523706380988780544
दरम्यान, उभय संघातील हा सामना केकेआरने ५२ धावांनी जिंकला. ऑस्ट्रेलियन दिग्गज पॅट कमिन्सने मुंबईच्या डावातील १५व्या षटकात कमाल करून दाखवली. त्याने पहिल्या, चौथ्या आणि शेवटच्या चेंडूवर विकेट्स घेतल्या आणि केकेआरचा विजय सोपा केला. केकेआरकडून मिळालेल्या १६६ धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचा संघ ११३ धावा करून सर्वबाद झाला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘रावळपिंडी एक्सप्रेस’चा विराट कोहलीला सल्ला; म्हणाला, ‘काही सिद्ध करण्याची गरज नाही, फक्त…’
‘…म्हणून वेंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले होते’, प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलमने सांगितले कारण






