मंगळवारी (दि. 9 मे) वानखेडे स्टेडिअमवर आयपीएल 2023चा 54वा सामना मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांना चोप देत आरसीबीच्या फलंदाजांनी मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात ग्लेन मॅक्सवेल याने गगनचुंबी षटकारांची बरसात केली. यामधील एक षटकार असा होता, जो कदाचित आतापर्यंत कुणीच पाहिला नसेल. आता ग्लेन मॅक्सवेलच्या षटकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाकडून ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) चौथ्या स्थानी फलंदाजीला उतरला होता. मॅक्सवेल फलंदाजीला आला तेव्हा संघाची धावसंख्या 2 बाद 16 होती. मॅक्सवेलने फलंदाजीला येताच पहिल्या षटकापासून चौकारांची बरसात करण्यास सुरुवात केली. या सामन्यात मॅक्सवेल 12.1 षटकापर्यंत मैदानावर टिकला. यादरम्यान त्याने 33 चेंडूत 68 धावांचा पाऊस पाडला. यामध्ये 4 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. मॅक्सवेलने एक षटकार असा मारला की, तो पाहून चाहतेही हैराण झाले.
खरं तर, मुंबईकडून डावातील 11वे षटक ख्रिस जॉर्डन टाकत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर मॅक्सवेलने अनोखा रिव्हर्स स्वीप शॉट मारला. यावेळी चेंडू थर्डमॅनच्या दिशेने षटकारासाठी पाठवला. हा शॉट पाहून सर्वजण हैराण झाले. या शॉटमध्ये जबरदस्त टायमिंग होती. आता सोशल मीडियावर या षटकाराचा व्हिडिओ वाहवा लुटत आहे.
व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
A Reverse Scoop like this to Jordan and that's goes for a SIX can only come from the bat of GLENN MAXWELL 🤯#RCBvsMI pic.twitter.com/3QCdHjJBHf
— Kartik_Srivastava (@TheKartikSri) May 9, 2023
बेंगलोरचा डाव
ग्लेन मॅक्सवेल आणि फाफ डू प्लेसिस यांनी तिसऱ्या विकेटसाठी 62 चेंडूत 120 धावांची भागीदारी रचली. यामध्ये फाफच्या 49, तर मॅक्सवेलच्या 68 धावांचा समावेश होता. पुढे फाफ 65 धावांवर बाद झाला. त्याच्याव्यतिरिक्त दिनेश कार्तिक यानेही 30 धावांचे मौल्यवान योगदान दिले. या तिघांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर आरसीबीने 6 विकेट्स गमावत 199 धावा केल्या. तसेच, मुंबईला विजयासाठी 200 धावांचे आव्हान दिले.
या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघानेही कडवी झुंज दिली. यावेळी मुंबईने 10 षटकांच्या खेळापर्यंत 2 विकेट्स गमावत 100 धावा केल्या होत्या. (mi vs rcb batter glenn maxwell amazing six video viral ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नवीन उल हकचा खोडसाळपणा! विराटची विकेट पडताच इंस्टावर शेअर केलेली ‘ती’ स्टोरी चर्चेत
फाफने मुंबईविरुद्ध पार केला मैलाचा दगड! भल्याभल्यांना न जमलेली कामगिरी अवघ्या 27 सामन्यात दाखवली करून