---Advertisement---

MI vs SRH: मुंबई इंडियन्स अडचणीत! प्लेऑफ गाठण्यासाठी करावं लागणार अशक्यप्राय काम

On: गुरूवार, एप्रिल 30, 2026 12:59 PM
---Advertisement---

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएल 2026 हंगाम अत्यंत निराशाजनक ठरत आहे. संघ विजयाच्या मार्गावर परतण्याचा प्रयत्न करत असला तरी सातत्याने अपयश येत आहे. काल, बुधवारी 240 पेक्षा जास्त धावा करूनही संघाला पराभव पत्करावा लागला. त्यामुळे आता मोठा प्रश्न असा निर्माण झाला आहे की, मुंबई इंडियन्स प्लेऑफच्या शर्यतीत टिकणार की बाहेर पडणार?

मुंबईने आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यापैकी फक्त 2 सामन्यांत विजय मिळवला आहे, तर 6 सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे. कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली संघ सध्या 4 गुणांसह गुणतालिकेत 9व्या स्थानावर आहे.

मुंबईसमोर अजून 6 लीग सामने बाकी आहेत. या सर्व सामन्यांत विजय मिळवला तर संघ 16 गुणांपर्यंत पोहोचू शकतो, जे प्लेऑफसाठी पुरेसे ठरू शकतात. मात्र, आतापर्यंतची कामगिरी पाहता सलग 6 सामने जिंकणे मोठं आव्हान आहे.

जर मुंबईने उर्वरित सामन्यांपैकी एक जरी सामना गमावला, तर 16 गुण गाठणं कठीण होईल. अशा परिस्थितीत संघ 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतो, पण तेव्हाही नेट रन रेट महत्त्वाचा ठरेल. सध्या मुंबईचा नेट रन रेट -0.784 इतका खराब आहे. त्यामुळे केवळ विजय नव्हे, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणंही आवश्यक आहे.

याशिवाय, इतर संघांच्या निकालांवरही मुंबईचे भवितव्य अवलंबून आहे. पंजाब किंग्ज,रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, आणि राजस्थान रॉयल्स यांसारख्या संघांनी सातत्याने विजय मिळवला, तर चौथ्या स्थानासाठीची स्पर्धा मर्यादित राहू शकते, ज्यामुळे मुंबईसाठी संधी निर्माण होऊ शकते. त्याचवेळी खालच्या क्रमांकावरील संघांनी पराभव पत्करणंही मुंबईसाठी फायदेशीर ठरेल.

मुंबई इंडियन्स हा असा संघ आहे, जो स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात जोरदार पुनरागमन करतो. 2014 आणि 2015 मध्ये त्यांनी अशीच कामगिरी केली होती. मात्र, यंदा तशी परिस्थिती निर्माण होईल का, याबाबत साशंकता आहे.

थोडक्यात सांगायचे तर, आता मुंबई इंडियन्ससाठी प्रत्येक सामना ‘करो या मरो’सारखा झाला आहे. एक जरी पराभव झाला, तर प्लेऑफची आशा जवळपास संपुष्टात येऊ शकते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---