ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि दमदार फलंदाज मायकल क्लार्क याने एक नवीन आणि आलिशान घर विकत घेतले आहे. हे एक बॅचलर पॅड (बॅचलर घर) आहे. त्याने हे घर लिलावामध्ये घेतले असून त्याची किंमत ऐकून तुम्ही चकित व्हाल. क्लार्कने हे घर तब्बल ७० कोटी रुपयांना घेतले आहे.
बॅचलर पॅड एक अशा घराचा प्रकार आहे, जेथे एक अविवाहीत आणि एकटा पुरुष राहतो. क्लार्क त्याची पत्नी आणि नंतर त्याच्या प्रेयसीपासून वेगळा झाला असून आता त्याने हे बॅचलर पॅड विकत घेतले आहे. क्लार्कने वर्ष २०१९ मध्ये पत्नी कायलीपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. तर यावर्षीच्या सुरुवातीला त्याची प्रेयसी आणि फॅशन डिझायनर पिप एडवर्ड्स हिच्यासोपतही ब्रेकअप झाला आहे आणि तो सध्या सिंगल आहे.
१३ मिलियन डाॅलर्सला घेतले नवीन घर
क्लार्कआधी दोन वर्षांपूर्वी कनाडाच्या फिलिप आणि एनेट जाॅन्सटन यांनी ९.५ मिलियन डाॅलर्सला विकत घेतले होते. पण क्लार्कने आता हे घर त्याहून अधिक किंमत, १३ मिलियन (७० करोड रुपये) डाॅलर्सला विकत घेतले आहे.
क्लार्कने घेतलेले नवीन घर वाक्लूसमध्ये आहे. त्याच्या या नव्या घरात ५ बेडरूम आहेत. हे घर त्या जागेपासून जवळच आहे, जेथे क्लार्क त्याच्या पत्नीसोबत राहत होता. दोघे अगोदर फिट्जविलियाम मेंशनमध्ये राहत होते. या दाम्पत्याने त्याचे हे जुने घर ८.३ मिलियन डाॅलर्सला विकत घेतले होते आणि १२ मिलियन डाॅलर्सला विकले होते. क्लार्क आणि कायली यांना ५ पर्षांची एक मुलगी आहे, जीचे नाव केल्सी आहे.
क्लार्कच्या नवीन आलिशान नवीन घराची वैशिष्ट्ये
क्लार्कचे हे घर आलिशान ७८४ वर्गमीटरमध्ये पसरलेले आहे. यामध्ये एक मिनरलाइज्ड गॅस-हिटेड टाइल पूल आहे. दोन आउटडोर शाॅवर आहेत आणि टस्कन स्टाइल कॅबाना आहे. तसेच घरात हीटेड लाइमस्टोन फ्लोर आहे. ४ बाथरूम, ३ गैस फायरप्लेस आणि डबल फ्रिजसह १ स्टोन आयलॅड किचन आहे. घराला एक सुंदर बालकनी आणि एक अप्रतिम ड्रेसिंग रूम आहे.
मायकल क्लार्कने पाच वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीत ११५ कसोटी, २४५ एकदिवसीय आणि ३४ टी२० सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३६ शतक आणि ८६ अर्धशतकांच्या जोरावर १७००० धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलिया संघाने त्याच्या नेतृत्वात २०१५ मध्ये विश्वचषक जिंकला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
तारीख ठरली! आयपीएलच्या २ नव्या संघांचा ‘या’ दिवशी लिलाव, पुणे फ्रँचायझीचे जुने मालकही उतरणार
‘या’ गोलंदाजांनी आयपीएलच्या एका हंगामात लुटवलेत सर्वाधिक षटकार, अनेक दिग्गजांचा समावेश
कोरोना योद्ध्यांच्या कामगिरीला आरसीबीचा सलाम, युएई टप्प्यातील पहिल्या सामन्यातून ‘असा’ करणार सन्मान