ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मायकेल क्लार्क हा क्रिकेट इतिहासातील काही सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक मनाला जातो. क्लार्क हा फक्त एक महान फलंदाजच नव्हता तर तो एक चांगला कर्णधार देखील होता. क्लार्कने ऑस्ट्रेलियाचे शानदार नेतृत्व करत संघाला 2015 साली विश्वविजेतेपद मिळवून दिले होते. दरम्यान क्लार्कने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या कारकीर्दीतील अनुभव मांडले आहेत. क्लार्कने आपल्या क्रिकेट कारकिर्दीतील सर्वात वेगवान गोलंदाजाबद्दल माहिती दिली, तर सर्वोत्तम फलंदाजाचे नाव देखील सांगितले.
क्लार्कने सांगितले की, पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर त्याच्या कारकीर्दीतील सर्वात वेगवान गोलंदाज होता. शोएब अख्तर व्यतिरिक्त त्याने ब्रेट ली, मिशेल जॉन्सन आणि शॉन टेट सारख्या गोलंदाजांचेही कौतुक केले आहे. हे सर्व गोलंदाज ताशी 150 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाने गोलंदाजी करण्यास सक्षम होते.
एका ऑनलाईन कार्यक्रमादरम्यान बोलताना मायकेल क्लार्क म्हणाला की,” माझ्या क्रिकेट कारकीर्दीत शोएब अख्तर हा सर्वात वेगवान गोलंदाज ठरला आहे. ताशी 160 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे होती. तसेच ब्रेट ली, मिशेल जॉन्सन, गिलेस्पी, शॉन टेट हे सर्वही अतिशय वेगवान गोलंदाज होते. पण या सर्व गोलंदाजांमध्ये शोएब अख्तर सर्वात वेगवान होता.”
कार्यक्रमादरम्यान मायकल क्लार्कला विचारले गेले की, कोणत्या फलंदाजाला तुम्ही सर्वश्रेष्ठ मानतात. या प्रश्नावर क्लार्कने भारतीय संघाचे माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकर यांचे नाव घेतले.
त्याचवेळी क्लार्कने ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगबद्दल सांगितले की, जेव्हा क्लार्कला संघाचा कर्णधार बनविण्यात आले तेव्हा त्याने रिकी पॉंटिंगला पाठिंबा दर्शविला होता. क्लार्क म्हणाला की,” निवड समितीचे सदस्य मला म्हणाले होते की, कर्णधारपद सोडल्यानंतर संघात कायम राहणारे फारच कमी खेळाडू आहेत. जर तुला पाँटिंगच्या बाबतीत अडचण होत असेल तर त्याला संघ सोडावा लागेल. यानंतर मी त्यांना सांगितले की, संघ आणि मला पाँटिंग यांची फार आवश्यकता आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
गेल दिसला अनोख्या अंदाजात; ‘पंजाबी डॅडी’ लूक होतोय व्हायरल
क्वारंटाईनमध्ये वेळ घालवण्यासाठी चेतेश्वर पुजाराला मिळाली सर्वात ‘क्यूट’ गेमिंग पार्टनर, पाहा फोटो
जेव्हा विराट कोहलीने सांगितले होते, ‘जडेजा आहे सर्वात खोटारडा व्यक्ती’; जुना व्हिडिओ होतोय व्हायरल