---Advertisement---

‘आयपीएलला बॅगा भरून पळाला असता’; मोईन अलीला क्लार्कने झापले

On: गुरूवार, नोव्हेंबर 17, 2022 10:42 AM
---Advertisement---

टी20 विश्वचषकाची रणधुमाळी संपल्यानंतर आता पुन्हा एकदा द्विपक्षीय मालिका सुरू झाल्या आहेत. गुरुवारी (17 नोव्हेंबर) ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्या दरम्यान वनडे मालिकेला सुरुवात झाली. विश्वचषकानंतर अवघ्या चौथ्या दिवशी ही मालिका सुरू होत असल्याने इंग्लंडचा उपकर्णधार मोईन अली याने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने अलीला चांगलेच खडसावले आहे.

रविवारी (13 नोव्हेंबर) विश्वचषकाचा अंतिम सामना खेळला गेला. यामध्ये इंग्लंडने पाकिस्तानला पराभूत करत आपले दुसरे विजेतेपद पटकावले. त्यानंतर आता गुरुवारी तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू झाली. विश्वचषक अंतिम सामना व या मालिकेत केवळ चार दिवसांचे अंतर असल्याने इंग्लंडचा उपकर्णधार मोईन अलीने नाराजी व्यक्त केली होती. तो म्हणालेला,

“विश्वचषकानंतर अवघ्या चौथ्या दिवशी मालिका सुरू होणे फारसे चांगले नाही. खेळाडूंना आपल्या क्षमतेने व त्याच उर्जेने खेळता येण्याची शक्यता फार कमी आहे. व्यावसायिक खेळाडू म्हणून आम्ही ती सवय लावून घेत आहोत. मात्र, दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सामना खेळणे योग्य नाही. त्यामुळे खेळाडू आपले शंभर टक्के योगदान देण्यास असमर्थ ठरतात.”

अलीच्या या वक्तव्यावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क याने आक्षेप नोंदवला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना तो म्हणाला,

“विश्वचषकानंतर लगेच आयपीएल खेळायला जायचे असते तर, मला नाही वाटत कोणी अशी तक्रारी केली असती. खेळाडूंनी आयसीसीच्या वेळापत्रकावर टीका करणे योग्य नाही. तुम्हाला दरवर्षी सहा ते आठ आठवड्यांचा वेळ दिलेला असतो. या काळात तुम्ही फ्रॅंचायजी क्रिकेट खेळण्याला प्राधान्य देता.”

मोईन अली हा दरवर्षी आयपीएल खेळण्यासाठी भारतात येत असतो. मागील तीन हंगामापासून तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. यांना तो दक्षिण आफ्रिका व युएई येथे देखील टी20 लीग खेळताना दिसेल.

(Michael Clarke Slams Moeen Ali On Busy Schedule)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अखेर मुहूर्त सापडला! दिल्लीमध्ये पाच वर्षांनंतर खेळला जाणार कसोटी सामना
‘धोनीमुळे भारतीय संघाची ताकत वाढेल’, माहीचे पाकिस्तानी दिग्गजाकडून गुणगान

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---