चेन्नई सुपर किंग्स हा इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील (आयपीएल) लोकप्रिय संघापैकी एक आहे. तसेच या संघाचा कर्णधार एमएस धोनी हा दिग्गज खेळाडूंपैकी एक मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली ४ आयपीएल विजेतेपदे मिळवली आहेत. धोनी चेन्नईबरोबर २००८ पासून जोडला गेलेला आहे. त्यामुळे त्याचे या संघाशी खूप विशेष नाते राहिले आहे. आता याबद्दल चेन्नईचा फलंदाजी प्रशिक्षक मायकल हसी याने खुलासा केला आहे.
धोनीने (MS Dhoni) २००८ ते २०१५ पर्यंत नियमितपणे चेन्नईने (Chennai Super Kings) प्रतिनिधित्व करताना नेतृत्व केले होते. त्याने २०१६ आणि २०१७ या दोन वर्षांसाठी चेन्नई संघावर स्पॉट फिक्सिंगमुळे बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे हे दोन वर्षे धोनी रायझिंग पुणे सुपर जायंट्स संघाकडून खेळला. पण २०१८ साली चेन्नई सुपर किंग्सचे आयपीएलमध्ये पुनरामगन झाले आणि धोनी पुन्हा चेन्नईमध्ये कर्णधाराच्या रुपात सामील झाला. त्यानंतर त्याने २०२१ पर्यंत नियमितपणे नेतृत्व केले.
पण २०२२ आयपीएलपूर्वी धोनीने १२ वर्षे चेन्नईचे नेतृत्व सांभाळल्यानंतर ही जबाबदारी रविंद्र जडेजाच्या खांद्यावर टाकली. पण जडेजाच्या नेतृत्वाखाली चेन्नईची कामगिरी खालावली, त्यामुळे त्याने ८ सामन्यांनंतर कर्णधारपद सोडले आणि धोनी पुन्हा चेन्नईचा कर्णधार झाला. धोनीने या १३ वर्षात चेन्नईला ४ विजेतीपदे मिळवून दिली. त्यामुळे इतकी वर्षे चेन्नईशी जोडली गेलेली असल्याने धोनीचे या संघाशी विशेष संबंध राहिले आहेत.
नुकतेच हसीने (Michael Hussey) चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या ‘सुपर रियुनियन’ व्हिडिओमध्ये मॅथ्यू हेडनशी बोलताना धोनीचे चेन्नई संघाशी किती घट्ट नाते आहे, हे सांगणाऱ्या एका घटनेचा खुलासा केला आहे. हसी म्हणाला, ‘माझ्यासाठी अशा काही आठवणी नाही, पण जेव्हा आपण या भितींवर विजेत्यांचे फोचो पाहातो… मला वाटते की, कदाचीत २०१८ हंगाम आहे. त्यापूर्वी आपण (चेन्नई सुपर किंग्स) दोन वर्षे बंदीमुळे बाहेर होतो. आपण परत आलो आणि मला आठवते की, हंगामाच्या सुरुवातीला एमएस भाषण देत होता. तेव्हा खरंच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मला वाटले होते की, येथे काहीतरी खास होत आहे.’
हसी देखील चेन्नई सुपर किंग्सकडून खेळला आहे. तसेच २०१८ पासून तो या संघाचा फलंदाजी प्रशिक्षक आहे. तो पुढे म्हणाला, ‘तो एक खास हंगाम होता. जेव्हा तुम्ही त्या हंगामाबद्दल विचार करता, तेव्हा तुमच्या अंगावर काटे उभे राहातात. हे तसेच होत होते, जसे आयपीएलमध्ये पुनरागमन झाल्यानंतर व्हायला हवे होते. एमएसने संपूर्ण हंगामात कमालीचा खेळ केला. तो खरंच एक विशेष काळ होता.’
चेन्नईसाठी २०२२ आयपीएल हंगाम मात्र खास ठरला नाही. त्यांनी १० पैकी ७ सामन्यांत पराभव पत्करला आहे, तर ३ सामने जिंकले आहेत. पण त्यांना प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडावे लागले आहे. आयपीएलमधील ही दुसरीच वेळ आहे, जेव्हा चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यात अपयश आले आहे. यापूर्वी २०२० साली चेन्नईला पहिल्यांदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवता आले नव्हते.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
अगस्त्य पांड्या आणि रशिद खानची जमली गट्टी, हार्दिकच्या पोराला खेळवतानाचा क्यूट Video व्हायरल
विराटला दक्षिण अफ्रिका, आयर्लंडविरुद्ध मिळणार विश्रांती? नक्की काय असेल पुढील योजना, वाचा सविस्तर