ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज आणि चेन्नई सुपर किंग्जचा सहाय्यक प्रशिक्षक मायकेल हसी आत्ताच कोरोनातून सावरला. आयपीएल हंगाम स्थगित झाला होता, त्यावेळी त्याला कोरोनाची लागण झाली होती. चेन्नईच्या संघातील कोरोनाचा संसर्ग झालेला तो तिसरा व्यक्ती ठरला होता.
मात्र, आता त्यावर यशस्वीपणे मात करून तो बरा झाला आहे. तसेच मायदेशी रवाना देखील झाला आहे. कोरोनातून बरा झाल्यानंतर त्याने आपला हा अनुभव चाहत्यांसह शेअर केला आहे.
“हा अनुभव भयावह होता”
‘मिस्टर क्रिकेट’ म्हणून ओळखला जाणारा हसी म्हणाला, “मला सुरुवातीला काही लक्षणे जाणवू लागली होती, तेव्हाच वाटले होते की मला संसर्ग झाला आहे. त्याशिवाय मी अनेक वेळा बसमध्ये आमचा गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजीच्या बाजूला बसलो होतो. त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळी मलाही खात्री वाटली होती की मलाही कोरोनाची लागण झाली असेल.”
चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यात मायकेल हसी व्यतिरिक्त त्यांचा बस चालक आणि गोलंदाजी प्रशिक्षक लक्ष्मीपती बालाजी यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला होता. ते देखील बरे झाले असून घरी परतले आहेत.
नेमका कधी अथवा कुठल्या वेळेला हा संसर्ग झाला असेल याबाबत हसी निश्चित काही सांगू शकला नाही. मात्र मुंबईतून बायोबबलमधून बाहेर पडून दिल्लीला जातांना हा संसर्ग झाला असल्याची शक्यता आहे. तो म्हणाला, “दिल्लीत धोका अधिक होता. आम्ही सराव करत होतो, त्यावेळी तिथे ग्राऊंड स्टाफ उपस्थित होता. सामन्याच्या दिवशी देखील तीच परिस्थिती होती. त्यामुळे आम्ही मुंबईच्या बायोबबल मधून बाहेर पडल्यावर निश्चितच धोक्यात वाढ झाली होती.”
हसीला कोरोनाची लागण झाल्याने इतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंसह मालदीवला जाता आले नाही. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला चेन्नईत दाखल करण्यात आले होते. १३ मे रोजी हसीची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने त्याचा मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा झाला.
महत्त्वाच्या बातम्या-
भारत-न्यूझीलंड संघापैकी ‘हा’ संघ जिंकणार पहिली टेस्ट चॅम्पियनशीप, दिग्गजाची भविष्यवाणी
माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटूने कसोटी चॅम्पियनशीपसाठी निवडला ‘या’ भारतीय गोलंदाजांचा तोफखाना
चालु सामन्यात गोलंदाजाने घेतली फलंदाजाची फिरकी, चाहत्यांना हसू आवरनेही झाले कठीण