---Advertisement---

मायकेल वॉनने पुन्हा ओकली गरळ, विराटबाबत केले वादग्रस्त वक्तव्य

On: शुक्रवार, मे 14, 2021 6:37 PM
---Advertisement---

जगात असे अनेक क्रिकेटपटू आहेत ज्यांना भारतीय संघ आणि इथल्या खेळाडूंविषयी काहीतरी वादग्रस्त विधान केल्याशिवाय राहवत नाही. भारतीय क्रिकेटपटूंचे पराक्रम आणि ख्याती न पाहवणारे बरेच माजी खेळाडू निरर्थक टिप्पण्या करत असतात. विशेषत: इंग्लिश खेळाडू जे भारतीय संघ किंवा भारतीय खेळाडूंवर टीका करण्याची संधी शोधत असतात. यात शीर्षस्थानी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनचे नाव आहे. मायकेल वॉनने पुन्हा वक्तव्य केले आहे. यावेळी त्याने भारतीय कर्णधार विराट कोहलीवर निशाणा साधला.

हा खेळाडू जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
इंग्लंडचा दिग्गज क्रिकेटपटू मायकेल वॉनने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर टीका केली आहे. वॉनने स्पार्क स्पोर्टशी बोलताना म्हणाले की, “केन विलियम्सन भारतीय असता तर तो जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला असता. मात्र, विराट कोहली भारतीय असल्याने त्याला असे म्हटले जाणार नाही.” वॉन पुढे म्हणाले की, “मला वाटते की केन विलियम्सन हा तिन्ही स्वरूपात सर्वोत्कृष्ट आहे. परंतु, विराट कोहलीसारखे १०० दशलक्ष इन्स्टाग्राम फॉलोअर्स नसल्याने तो मागे पडलेला दिसतो तसेच, केन क्रिकेटच्या पलीकडे दरवर्षी जाहिरातींमधून मोठा पैसा कमवत नाही.”
इंग्लंडचा ऍशेस विजेता कर्णधार असलेला वॉन सध्या समालोचक म्हणून कार्यरत आहे. समालोचना दरम्यान तो अनेकदा वाद निर्माण होईल अशी वक्तव्य करताना दिसतो. त्याचप्रमाणे, ट्विटरवर भारत आणि भारतीय खेळाडूंविषयी त्याने कायम गरळ ओकली आहे. भारत विरुद्ध विधाने केल्यामुळे अनेकदा त्याला चाहत्यांच्या रोषाला देखील सामोरे जावे लागले होते.

विराट आहे सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटू
भारतीय कर्णधार विराट कोहली जगातील पहिला क्रिकेटपटू बनला आहे ज्याचे इन्स्टाग्रामवर १०० दशलक्षाहून जास्त फॉलोअर्स आहेत. यासह विराट रोनाल्डो, मेस्सीसारख्या जगातील बड्या खेळाडूंमध्ये सामील झाला आहे. विराट कमाईच्या बाबतीत जगातील सर्व क्रिकेटपटूंपेक्षा खूप पुढे आहे, त्याची वार्षिक कमाई १०० कोटींपेक्षा जास्त असून पुमा, ऑडी अशा अनेक आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डशीही त्याने करार केले आहेत. विराट आयपीएलमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा खेळाडू देखील आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता वॉनने असे विधान केले असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

धोनीच्या नेतृत्त्वाखाली वनडे पदार्पण करणारा खेळाडू आहे पुनरागमनाच्या प्रतिक्षेत, श्रीलंका दौऱ्यावर मिळणार संधी?

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात खेळलेले ११ भारतीय, आज असतात तरी कुठे?

दहा वर्षांनंतर इयान बेलने ‘त्या’ विवादीत रनआउटबद्दल सोडले मौन; म्हणाला, “माझीच चूक होती, मी…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---