जागतिक कसोटी क्रिकेटमध्ये स्टीव्ह स्मिथ, जो रूट, विराट कोहली आणि केन विल्यमसन यांना फॅब-4 म्हणून पाहिले जाते. अशा परिस्थितीत या चौघांची तुलना करणे देखील तसं सामान्यच आहे. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन यांनी जो रूटची तुलना विराट कोहलीशी तुलना केली आहे. परंतु या पोस्टद्वारे असे दिसते की त्याला भारतीय क्रिकेट चाहत्यांना त्रास द्यायचा आहे.
मायकल वाॅनच्या या सोशल मीडियावरील पोस्टवर चाहत्यांचा राग जोरदारपणे बाहेर आला आहे. परिणामी त्यांना बरेच काही ऐकावे लागत आहे. सध्या इंग्लंड विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना लॉर्डच्या मैदानावर खेळला जात आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी जो रूटने 143 धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे हे 33 वे शतक होते. सक्रिय कसोटी क्रिकेटपटूंबद्दल बोलायचे झाल्यास जो रुट शतक आणि धावांबाबतीत सर्वांच्या पुढे आहे. दरम्यान वॉनने एका कागदाचा फोटो शेअर केला. ज्यामध्ये विराट कोहली आणि जो रूट यांची कसोटी रेकॉर्ड लिहिले आहेत.
हा फोटो पोस्ट करताना त्यांनी ‘मॉर्निंग इंडिया’ लिहिले. मग चाहत्यांनी त्यांचा वर्ग काय सुरू केला. खरं तर, वाॅनने या पोस्टमध्ये त्या दोघांची संपूर्ण कसोटीची कामगिरी लिहिली आहे. ज्यामध्ये किती कसोटी खेळल्या आहेत, किती धावा केल्या आहेत, कोणत्या स्ट्राइक रेट आणि या धावांनी हे धावा कसे मिळवले हे त्यांनी लिहले आहे. वाॅर्नने या सर्व विक्रम एका कागदावर लिहून पोस्ट शेअर केला आहे.
यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांनी वॉनला धारेवर घेतलं आहे. एका वापरकर्त्याने लिहिले आहे की वॉन विराट कोहलीच्या 80 शतके गाठण्यासाठी दोन जन्म घेईल, तर दुसर्याने लिहिले की रूटने ऑस्ट्रेलियामध्ये एक शतक नाही. त्याने घराच्या मैदानावरच अधिक धावा केल्या आहेत.
हेही वाचा-
RCB साठी आनंदाची बातमी! संघातील ‘या’ स्टार खेळाडूने ठोकले झंझावाती शतक
10 लाखापासून सुरुवात, आता कोट्यावधी रुपयांचा मालक; पाहा याॅर्कर किंगची नेटवर्थ
पॅरिसमधून आनंदाची बातमी; भारताला मिळालं पहिलं सुवर्णपदक