भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आगामी 18 ते 22 जून दरम्यान वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाईल. भारतासाठी हा सामना महत्त्वाचा असणार आहे कारण न्यूझीलंडकडून विश्वचषक 2019 मध्ये झालेल्या पराभवापाची परतफेड करायची आहे. दरम्यान नुकतेच इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने टेस्ट चँपियनशिपच्या विजेत्याबद्दल भविष्यवाणी केली आहे.
एका मीडिया हाऊसशी बोलताना वॉन म्हणाला की न्यूझीलंड संघ विजेतेपदावर आपले नाव कोरेल. इंग्लंडची स्थिती, ड्यूक बॉल आणि भारताचं व्यस्त वेळापत्रक या सर्व बाबींमुळे न्यूझीलंडची बाजू उजवी असल्याचे मत वॉर्नने मांडले आहे. भारतीय संघ आठवड्यापूर्वी इंग्लंडमध्ये पोहोचेल व लवकरच अंतिम सामना खेळेल. अंतिम सामन्यापूर्वी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंडची कसोटी मालिका होणार असल्याने न्यूझीलंडचा सराव देखील होणार असल्याचे मत वॉर्नने मांडले आहे.
वॉर्न पुढे म्हणाला की, हे पूर्णपणे स्पष्ट आहे की न्यूझीलंड भारतापेक्षा अधिक चांगली तयारी करेल. तसेच त्यांच्या अधिक खेळाडूंना ड्यूक बॉलने क्रिकेट खेळण्याचा अनुभव असणार आहे. त्यामुळे वॉर्नच्यामते अंतिम सामना न्यूझीलंड जिंकेल. वॉर्नने सध्याच्या न्यूझीलंड संघाला इतिहासातील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून वर्णन केले आहे. तो म्हणाला की, केन विलियम्सनच्या नेतृत्वाखाली संघाने शिस्तबद्ध कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली आहे आणि हा संघ गुणवत्तापूर्ण आहे.
दरम्यान, आगामी 18 जून रोजी भारत आणि न्यूझीलंडचे संघ साऊथॅम्प्टनच्या मैदानावर कसोटीतील पहिल्या चॅम्पियनशीपसाठी भिडतील. भारतीय संघासाठी न्यूझीलंड विरुद्ध होणार सामना इतका सोपा होणार नाही, कारण किवी गोलंदाज इंग्लंडच्या खेळपट्ट्यांवर अधिक घातक ठरतील. विशेषत: टीम साऊथी आणि डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट भारतीय संघासाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळेच न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध भारताला सुरुवातीपासूनच शानदार कामगिरी करावी लागेल, तेव्हाच भारताचे कसोटी विश्वविजेतेपदाचे स्वप्न पूर्ण होईल.
महत्त्वाच्या बातम्या –
माजी भारतीय दिग्गज क्रिकेटपटूने कसोटी चॅम्पियनशीपसाठी निवडला ‘या’ भारतीय गोलंदाजांचा तोफखाना
चालु सामन्यात गोलंदाजाने घेतली फलंदाजाची फिरकी, चाहत्यांना हसू आवरनेही झाले कठीण