---Advertisement---

‘तो स्वत:ला एक अपयशी कर्णधार समजेल’, इंग्लंडच्या माजी कर्णधाराने विराटच्या जखमेवर चोळले मीठ

On: मंगळवार, ऑक्टोबर 12, 2021 11:30 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ चा एलिमिनेटर सामना कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात पार पडला. या सामन्यात केकेआरने विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला चार विकेट्स राखून पराभूत केले. त्यामुळे आरसीबी संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. विराटच्या नेतृत्वातील आरसीबी संघ यावर्षीही जेतेपद जिंकू शकणार नसल्यामुळे इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी विराटवर निशाणा साधला आहे.

आरसीबीच्या कर्णधाराच्या रूपातील विराट कोहलीचा हा शेवटचा हंगाम होता. विराटने आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्याच्या सुरुवातीलाच या गोष्टीची घोषणा केली होती की, तो पुढच्या वर्षी संघाचे नेतृत्व करणार नाही, पण एक खेळाडूच्या रूपात पुढील वर्षीपासून संघासोबत कायम राहिल.

दरम्यान, आरसीबी संघाला आयपीएलच्या इतिहासात एकदाही आयपीएलचे जेतेपद जिंकता आलेले नाही. अशात मायकल वॉनने विराटच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. वॉनच्या मते एकादाही फ्रेंचायझीला आयपीएलची ट्रॉफी न जिंकवणाऱ्या कर्णधाराच्या रूपात विराटला लक्षात ठेवले जाईल.

मायकल वॉन क्रिकबजवर बोलत होते. त्यावेळी ते विराटविषयी बोलताना म्हणाले की, कर्णधाराच्या रूपात विराटच्या यशाला नाकरले जाऊ शकत नाही. त्याने भारतीय संघाला विकसीत केले आहे, ज्याला उत्कृष्ट म्हटले जाईल. पण तुम्हाला पूर्ण इमानदारीने म्हणावे लागेल की, एकदिवसीय आणि टी२० व्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कर्णधाराच्या रूपात तो कसोटीमधील प्रदर्शनाप्रमाणे कामगिरी करू शकला नाही आणि खूप मागे राहिला आहे.

ते पुढे म्हणाले, आयपीएलमध्ये एका कर्णधाराच्या रूपात त्याचा हाच वारसा असेल की, तो एकदाही संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. आरसीबीमध्ये विश्वस्तरीय खेळाडू असूनही, तुम्हाला समजून घ्यावे लागेल की, उच्च स्तरावरील खेळामध्ये तुम्हाला त्या सीमेपार जावे लागेल, जेथून संघाला ट्रॉफी जिंकवून देऊ शकाल; विशेषत: जेव्हा तुम्ही विराट कोहलीच्या पातळीवर असाल. मी निश्चित हे म्हणू शकत नाही, पण तो स्वत:ला आयपीएलमध्ये एक अपयशी कर्णधाराच्या रूपात पाहील. कारण त्याच्या खेळाचा स्तर खूप उंच आहे आणि तो स्वत:ला नेहमी जिंकताना पाहू इच्छितो.

विराटने पहिल्यांदा २०१३ मध्ये आरसीबीचे नियमित कर्णधारपद सांभाळले होते. त्यापूर्वी २०११ मध्ये त्याने ३ सामन्यांत संघाचे नेतृत्व केलेले. त्यानंतर त्याने आतापर्यंत १४० सामन्यात संघाचे नेतृत्व केले. ज्यापैकी ६६ सामन्यांमध्ये संघाने विजय मिळवला आहे. विराटच्या नेतृत्वात संघाने चांगले प्रदर्शन केले आहे. विराटने २०१६ मध्ये संघाला आयपीएलच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवून दिले होते. तसेच मागच्या दोन हंगामांपासून संघाने प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. असे असले तरी त्याच्या नेतृत्वात संघाला  एकदाही जेतेपद मिळवता आले नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

शेफाली वर्माने गमावले टी२० क्रमवारीतील अव्वल स्थान, ऑसी फलंदाजाने टाकले मागे

विराट कोहली आता आयपीएलही सोडू शकतो, ‘या’ माजी क्रिकेटरने मत व्यक्त करताना कारणही केले स्पष्ट

आयपीएल स्पर्धेने उघडले नशिबाचे दार; ‘या’ दोन खेळाडूंची होऊ शकते टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियात एन्ट्री

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---