---Advertisement---

‘धोनीच्या शेवटच्या सामन्यासाठी पाहायचीय मोठी गर्दी,’ इंग्लंडच्या दिग्गजाचे वक्तव्य

---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीने १५ ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना प्रेक्षकांच्या उपस्थितीत मागील वर्षी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळला होता. जवळपास एका वर्षांनंतर तो आयपीएल २०२०मध्ये प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत चेन्नई सुपर किंग्जकडून क्रिकेट खेळताना दिसला. या हंगामातील शेवटच्या साखळी सामन्यात त्याने आपण पुढेही आयपीएल खेळणार असल्याचे म्हटले. त्यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉने धोनीच्या आयपीलमधील शेवटच्या सामन्याबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.

धोनीला आणखी एक वर्ष आयपीएल खेळावे लागेल- वॉ

“पुढील वर्षी २०२१ मध्ये आयपीएलचे आयोजन युएईमध्ये झाले, तर धोनीला त्यापुढील वर्षी २०२२मध्येही आयपीएल खेळावे लागेल,” क्रिकबझशी बोलताना वॉने म्हटले.

‘मला त्याच्या शेवटच्या सामन्यासाठी एक मोठी गर्दी पाहायची आहे’

धोनी शानदार निरोप सामन्याचा हक्कदार आहे. त्यामुळे त्याने आपला शेवटचा सामना प्रेक्षकांसमोर खेळायला पाहिजे, असे मायकल वॉने म्हटले.

“त्याला पुढील वर्षी कमीत कमी एक स्पर्धा खेळावी लागेल. तो प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत निवृत्ती घेऊ शकत नाही. कोणताही खेळाडू एका मोठ्या गर्दीसमोर निरोप घेण्याचा हक्कदार आहे. तो खेळू शकत नसेल, तर तो गायब होईल आणि आपल्याला न सांगताच तो निरोप घेईल. जसे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केले होते. परंतु मला त्याच्या शेवटच्या सामन्यासाठी एक मोठी गर्दी पाहायची आहे” असे वॉने धोनीबद्दल बोलताना म्हटले.

किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध विजय मिळवत चेन्नई आयपीएल २०२०मधून बाहेर

आयपीएल २०२० च्या आपल्या शेवटच्या सामन्यात चेन्नईने किंग्ज इलेव्हन पंजाबला ९ विकेट्सने पराभूत केले. यासह ते आयपीएल २०२० मधून बाहेर पडले. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाडने ६२ धावांची अर्धशतकी खेळी केली. यासह त्याने सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक ठोकण्याचा विक्रम केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-“भारताच्या ‘या’ राज्यात बनेल एमएस धोनीचे मंदीर,” माजी क्रिकेटरचे मोठे विधान

-एमएस धोनीच्या ‘त्या’ सल्ल्यामुळे मिळाला ऋतुराजला धीर; तब्बल ३ आठवडे क्वारंटाईनमध्ये राहुनही नाही खचला

-“शेवटच्या वेदनादायक १२ तासांचा आनंद घ्या”, असे का म्हणाला एमएस धोनी, घ्या जाणून

ट्रेंडिंग लेख-

-वाढदिवस विशेष: ऑस्ट्रेलियाचा दिग्गज गोलंदाज मिशेल जॉन्सनबद्दल या खास गोष्टी माहित आहेत का?

-…आणि रोहितचा रो’हिट’ झाला!

-सुरुवात हुकली पण शेवट आमचाच! आयपीएलच्या दुसऱ्या हाफमध्ये शानदार कामगिरी करणारे ३ संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---