---Advertisement---

सुरुवातीलाच गेला असता, पण बर्न्समुळे रोहितला दोनदा जीवनदान; इंग्लिश दिग्गजानेच घेतली फिरकी

On: रविवार, सप्टेंबर 5, 2021 9:03 AM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलवर खेळल्या जात असलेल्या चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात रोहित शर्मा याला दोन वेळा जीवनदान मिळाले होते. दोन्ही वेळा इंग्लंडचा सलामीवीर रोरी बर्न्स याने त्याचा झेल सोडला. आता रोहितचा झेल सोडणे इंग्लंडला किती महागात पडले आहे, हे त्याच्या शतकी खेळीने कळालेच असेल. यानंतर आता बर्न्सच्या क्षेत्ररक्षणावर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने त्याची फिरकी घेतली आहे. त्याने बर्न्सबद्दल एक गमतीदार ट्विट केले आहे.

वॉनने लिहिले की, ‘रोरी बर्न्सला आज संध्याकाळी माझ्या क्षेत्ररक्षण अकॅडमीमध्ये आमंत्रित केले जाईल.’ यावर चाहत्यांनीही बर्न्सची खिल्ली उडवली आहे.

बर्न्सने सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी रोहितचे झेल सोडले आहेत. ओव्हल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा पहिला डाव संपल्यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल फलंदाजीसाठी उतरले होते. जेम्स अँडरसन तिसरे षटक टाकत होता. त्याच्या षटकाचा तिसरा चेंडू ऑफ स्टंपच्या थोडा बाहेर होता. रोहित ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटची कड घेऊन दुसऱ्या स्लिपवर उभा असलेला रोरी बर्न्सच्या दिशेने गेला. पण त्याचे चेंडूकडे लक्ष नव्हते. त्यामुळे हा झेल सोडला आणि चेंडू सीमेपलीकडे गेला. त्यावेळी रोहित अवघ्या ६ धावांवर खेळत होता.

https://twitter.com/mscmedia2/status/1433859484997152774?s=20

यानंतर इंग्लंडच्या बर्न्सने पुन्हा रोहितचा झेल सोडला. यावेळी गोलंदाज होता ऑली रॉबिन्सन. तो भारतीय डावातील २७ वे षटक टाकत होता. त्याच्या षटकाचा शेवटचा चेंडू ऑफ-स्टंपच्या बाहेर जात होता. रोहित त्याचा बचाव करून खेळण्याचा प्रयत्न करत होता. पण चेंडू बॅटची कड घेऊन वेगाने मागे गेला. स्लिपमध्ये उभा असलेला बर्न्सने झेल पकडण्यासाठी डाईव्ह मारली, पण तो चेंडू पकडू शकला नाही. यावेळी चेंडू त्याच्यापासून दूर होता. पण मोठे सामने जिंकण्यासाठी असे झेल घ्यावेच लागतात. त्यावेळी रोहित ३१ धावांवर खेळत होता. या जीवनदानाचा पुरेपूर फायदा घेत रोहितने शतकीय खेळी साकारली आहे.

दुसरीकडे, या मालिकेतील रोरी बर्न्सची कामगिरी संमिश्र राहिली आहे. नॉटिंगहॅममधील पहिल्या कसोटीत त्याला फलंदाजीत फारसे काही करता आले नाही. यानंतर, त्याने लॉर्ड्स कसोटीत ४९ धावा आणि लीड्समध्ये ६१ धावांची खेळी खेळली. मात्र, ओव्हल कसोटीच्या पहिल्या डावात त्याला केवळ ५ धावा करता आल्या. इंग्लंडला त्याच्याकडून दुसऱ्या डावात चांगल्या फलंदाजीची अपेक्षा राहील.

महत्त्वाच्या बातम्या-

षटकार अन् हिटमॅन, एक अनोखंच नातं! कारकिर्दीतील ‘हे’ ४ महत्त्वाचे टप्पे गाठताना रोहितने चेंडू केलाय सीमापार

यंदाचे वर्ष रो’हिट’! ‘असा’ कारनामा करणारा ठरलाय पहिलाच भारतीय, आता पंतलाही विक्रम करण्याची संधी

कसोटीत षटकारासह सर्वाधिकवेळा शतक करणारा रोहित दुसराच भारतीय, पहिल्या क्रमांकावर ‘हा’ फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---