टी-२० विश्वचषकात ऑस्ट्रेलियाने अंतिम सामन्यात न्यूझीलंडला ८ विकेट्सने मात दिली आणि पहिल्यांदाच टी-२० विश्वचषक जिंकला. तत्पूर्वी क्रिकेटमधील अनेक दिग्गजांनी विजेतेपदाबाबत भविष्यवाणी केली होती आणि ऑस्ट्रेलिया जेतेपदासाठी प्रबळ दावेदार नसल्याचे सांगितले होते. यामध्ये इंग्लंड संघाचे माजी दिग्गज कर्णधार मायकल वॉन यांचाही समावेश होता. त्यांच्या मते ऑस्ट्रेलिया संघ पहिल्या चार संघातही स्थान बनवू शकत नव्हता. पण आता त्यांची ही भविष्यवाणी चुकीची ठरली आहे. जेतेपद जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज ऍडम झम्पाने वॉन यांच्यावर निशाणा साधला आहे.
विजेतेपद मिळवल्यानंतर अनेक खेळाडूंनी विजयाच्या आनंदात सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत. अशातच फिरकी गोलंदाज झम्पाने मात्र सोशल मीडियाच्या माध्यामतून मायकल वॉन यांच्यावर मजेशीर अंदाजात निशाणा साधला आहे. त्याने पोस्टमध्ये वॉनने यापूर्वी ऑस्ट्रेलियाविषयी बोलताना ज्याप्रकारे प्रतिक्रिया दिली होती. अगदी त्याचप्रकारे त्याची खिल्ली उडवली आहे.
त्याने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले की, “मी हे आता म्हणत आहे, ऑस्ट्रेलियाकडे काही जास्त संधी नाहीत. टी-२० क्रिकेटमध्ये त्यांनी खूप संघर्ष केला आहे. मला नाही वाटत ऑस्ट्रेलिया संघ जास्त लांब जाईल. इंग्लंड, भारत, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड किंवा पाकिस्तान संघ लांबचा पल्ला गाठतील.”
https://www.instagram.com/p/CWSy3HTBgf1/?utm_source=ig_web_button_share_sheet
यापूर्वी वॉनने बीसीसीआयला दिलेल्या एका मुलाखतीत अगदी अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली होती, जी झम्पाने त्याच्या पोस्टमध्ये लिहिली आहे. वॉन त्यावेळी म्हणाला होते की, “ऑस्ट्रेलिया संघ पूर्णपणे ग्लेन मॅक्सवेलवर निर्भर आहे आणि त्यांच्याकडे फॉर्ममधील खेळाडू नाहीत, जे संघाला लांबपर्यंत घेऊन जातील. त्यांच्या मते ऑस्ट्रेलिया संघाने टी-२० मध्ये संघर्ष केला आहे आणि त्यांच्याकडे जास्त संधी नाहीय. ग्लेन मॅक्सवेल अप्रतिम फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यासाठी ही स्पर्धा जबरदस्त जाणार आहे. पण मला नाही वाटत ऑस्ट्रेलिया संघ जास्त काही करू शकेल. भारत, इंग्लंड, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड हे टॉप ४ क्रमांकावर राहणार आहेत किंवा पारिस्थितीचा फायदा घेऊन पाकिस्तान देखील येथे पोहोचू शकतो.”
दरम्यान, ऍडम झम्पाने ऑस्ट्रेलियासाठी संपूर्ण टी-२० विश्वचषकात उत्तम गोलंदाजीचे प्रदर्शन केले आहे. संघाला जेतेपद मिळवून देण्यासाठीही त्याची महत्वाची भूमिका राहिली आहे. त्याने विश्वचषकादरम्यान खूपच कमी धावा दिल्या आणि १३ विकेट्स घेत दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
एनसीएच्या अध्यक्षपदी वीवीएस लक्ष्मण यांचीच लागणार वर्णी! सनरायझर्स हैदराबादनेही केलीय पुष्टी
बांगलादेश दौऱ्यासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, ६०० विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाऐवजी ‘या’ बॉलरची निवड
टी२० विश्वचषकातून वगळण्याबाबत भारताच्या चहलने सोडले मौन; म्हणाला, “मला ४ वर्षे संघाबाहेर…”