क्रिकेटच्या खेळामध्ये सर्वात जबाबदार व्यक्ती म्हणून पंचांकडे पाहिले जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो अथवा गल्ली क्रिकेट असो पंचांच्या निर्णयावर सर्वकाही अवलंबून असते. अनेकदा पंचांच्या निर्णयांमुळे वादही झालेले पाहायला मिळतात. त्याचवेळी, पंचांच्या काही कृतीमुळे पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू देखील उमटते. अशाच एका पंचाची सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा सुरू आहे. एका स्थानिक स्पर्धेमध्ये पंचगिरी करत असलेल्या या पंचाची दखल चक्क इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (England Former Captain Michael Vaughn) यानेदेखील घेतली.
कोण आहे हा पंच?
प्रसिद्ध क्रीडा पत्रकार सारंग भालेराव यांनी नुकताच एक व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडलवर शेअर केला. यामध्ये एक पंच वाईड चेंडूचा निर्णय (Wide Ball Decision) चक्क डोक्यावर उभे राहत देताना दिसले. (Cricket Umpire Stand On Head) अल्पावधीतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरू लागला. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन याची नजर देखील या व्हिडिओवर पडली. त्यानेदेखील हा व्हिडिओ ट्विट करत त्याला ‘आपल्याला असा पंच आयसीसी एलिट पॅनलमध्ये हवा.’ असे कॅप्शन दिले. या व्हिडिओवर चाहत्यांच्या अजब प्रतिक्रिया आल्या असून, त्याला कोणी बाबा रामदेव यांचा शिष्य तर कोणी टायगर श्रॉफ अशी उपाधी दिली.
Surely we need to see this chap join the ICC Elite panel .. 👍🙌🙌 pic.twitter.com/FcugJBgOEn
— Michael Vaughan (@MichaelVaughan) December 5, 2021
पुरंदर येथील बोपगाव येथे मागील महिन्यात झालेल्या पुरंदर प्रीमियर लीग या टेनिस बॉल क्रिकेट (Tennis Ball Cricket) स्पर्धेतील हा व्हिडिओ अाहे. अशा अजब पद्धतीने पंचगिरी करणाऱ्या या पंचांचे नाव दीपक नाईकनवरे असे असून, ते संपूर्ण महाराष्ट्रात ‘डीएन रॉक’ (DN Rock) या नावाने ओळखले जातात. ते मूळता पंढरपूर येथील रहिवासी असून, सध्या पुणे येथे स्थायिक आहेत.
बिली बाऊडेन यांची झाली आठवण
डीएन रॉक यांच्या या व्हिडिओनंतर सर्व क्रिकेटप्रेमींना न्यूझीलंडचे जगप्रसिद्ध पंच बिली बाऊडेन (Billy Bowden) यांची आठवण झाली. कारण, बाऊडेन हे अशाच प्रकारे आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत निर्णय देताना दिसत. बाऊडेन यांनी १९९५ ते २०१६ अशी २१ वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पंच म्हणून काम पाहिले. त्यांनी आपल्या या प्रदीर्घ कारकिर्दीत ३०८ सामन्यात पंच म्हणून सेवा दिली.
महत्त्वाच्या बातम्या-
https://mahasports.in/ruturaj-gaikwad-named-as-captain-of-maharashtra-team-for-vijay-hazare-trophy/
https://mahasports.in/ruturaj-gaikwad-named-as-captain-of-maharashtra-team-for-vijay-hazare-trophy/