भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका चालू आहे. मात्र, सामन्यातील पाच दिवसांचा खेळ पावसामूळे पुर्ण झाला नाही. मालिकेतील दुसरा सामना १२ ऑगस्टपासून लंडनच्या लॉर्ड्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्याकील इंग्लंडची खराब फलंदाजी पाहून इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वाॅनने पुढच्या कसोटी सामन्यासाठी दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्याचा सल्ला दिला आहे.
भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात झॅक क्राॅली आणि डोमनीक सिबली या दोघांना बाहेर काढण्यासाठी आग्रह केला आहे. पहिल्या कसोटीत क्रॉलीने पूर्ण सामन्यात केवळ 33 धावा केल्या आणि सिबलीने 46 धावा केल्या आहेत. इंग्लंडने त्यांच्या दुसऱ्या डावात केवळ कर्णधार जो रुटच्या शतकी खेळीमुळे 303 धावा केल्या होत्या. त्यामुळे माजी कर्णधार मायकल वाॅनने क्रॉली आणि सिबलीच्या जागी हसीब हमीद आणि डेविड मलान या दोघांचे नाव सुचवले आहे.
शतकवीर हमीदला प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी करायला हवे
वाॅनने बीबीसीसोबत चर्चा करताना म्हटले की, “झॅक क्रॉली कसोटी सामन्यातील एक उत्तम खेळडू आहे. मात्र, सध्या त्याच्या बॅटमधून धावा बनत नाहीयत. मी लाॅड्सवर क्राॅलीला प्लेइंग इलेव्हनमध्ये ठेवू इच्छित नाही. मात्र, तो यावर्षीच्या अंती ऍशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला जाण्यासाठी ठिक आहे. क्राॅलीला थोड्या वेगळ्या प्रकारे खेळण्याची आणि त्याच्या शैलीत सुधार करुन पुन्हा संघात येण्याची गरज आहे. ”
वाॅनने सुचवले की, इंग्लंडने क्रॉलीच्या जागी हसीब हमीदला आणले पाहिजे, जो या उन्हाळ्यात काउंटी चाॅम्पियनशिपमध्ये चांगल्या फाॅर्मात होता. विषेश गोष्ट ही आहे की, हमीदने सराव सामन्यात भारत एकादशच्या विरुद्ध शतक केले होते. तिथे तो सिलेक्ट काउंटी एकादशसाठी खेळला होता.
डेविड मलानला लॉर्डवर मिळायला हवी संधी
वाॅनचे मत आहे की, नाॅटींघम कसोटीमध्ये 18 आणि 28 धावा करणाऱ्या सिबलीने भारताविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात संधी मिळण्यालायक प्रदर्शन केले नाही. त्यामुळे मलान ज्याने उन्हाळी हंगामात काउंटी चॅम्पियमशिपमध्ये 199 धावा केल्या आहेत, त्याला संधी मिळाली पाहिजे.
महत्त्वाच्या बातम्या-
बुमराहचा बूमरँग! इंग्लंडमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा बनला केवळ तिसरा भारतीय गोलंदाज
‘पाऊस आला नसता तर आम्ही भारताच्या नऊच्या नऊ विकेट घेतल्या असत्या,’ कर्णधार रूटची प्रतिक्रिया
धोनीमुळे माझ्यासाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद झाले; ‘या’ यष्टीरक्षक फलंदाजाचे मोठे वक्तव्य