इंडियन प्रीमियर लीग २०२१ च्या प्रत्येक सामन्यात अटीतटीचे सामने पाहायला मिळत आहेत. आयपीएलच्या गेल्या १३ हंगामात जेतेपद पटकावण्यात अपयशी ठरलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने या हंगामातील पाहिले ३ सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा संघ विजयाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. अशातच माजी इंग्लिश कर्णधाराला देखील असेच वाटते की, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आयपीएलचे जेतेपद पटकावणार आहे. त्याने यामागचे कारण देखील सांगितले आहे.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने आयपीएलच्या सुरुवातीलाच मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघांना पराभूत केले आहे. त्यामुळे माजी इंग्लिश कर्णधार माइकल वॉनला वाटत आहे की, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ यंदा आयपीएलचे जेतेपद पटकावणार.
त्याने ट्विट करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे अभिनंदन केले आहे. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “गेल्या काही वर्षांमध्ये हा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा सर्वात संतुलित संघ आहे. या वर्षी जेतेपद त्यांचे होऊ शकते. फक्त तेव्हाच जर ते नॉकआउटमध्ये मुंबई इंडियन्स संघाला हरवतील.”
This is best balanced @RCBTweets for many many years …. Could this be the year !!!! Only if they beat @mipaltan in the knockouts !!!! #DoubtIt #IPL2021
— Michael Vaughan (@MichaelVaughan) April 18, 2021
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे फलंदाज यंदा चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार विराट कोहलीसह, एबी डिविलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेल हे फलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. मॅक्सवेलने गेल्या ३ सामन्यात २ अर्धशतक झळकावले आहेत. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलने ७८ धावा केल्या होत्या. यासोबतच एबी डिविलियर्सने नाबाद ७६ धावांची खेळी केली होती.
याबरोबरच शहाबज अहमद आणि हर्षल पटेलमुळे त्यांच्या गोलंदाजीला धार मिळाली आहे. मोहम्मद सिराजही चांगली कामगिरी करताना दिसत आहे. त्यामुले हे फलंदाज आणि गोलंदाज जर अशाच फॉर्ममध्ये असतील तर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ, आपले पहिलेवहिले जेतेपद जिंकू शकते.
महत्त्वाच्या बातम्या-
हे कोलकाताचे दुर्दैव आहे की त्यांच्याकडे असा खेळाडू आहे; इंग्लिश दिग्गजाने व्यक्त केली चिंता
क्या यही प्यार है? पतीचे यश पाहून धनश्री वर्माचे डोळे पाणावले, पाहा तो भावुक करणारा क्षण
“आगामी सामन्यात शमीला सलामीला पाठवा,” कर्णधार राहुलच्या रणनितीवर भडकला भारतीय दिग्गज