---Advertisement---

टी२०त ५ शतके झळकावणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरची कारकिर्द संपुष्टात! मिळाला निवृत्तीचा सल्ला

On: बुधवार, जुलै 7, 2021 2:32 PM
Alex Hales, Ben Stokes
---Advertisement---

येत्या ८ जुलैपासून पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये वनडे मालिकेला प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघातील ३ खेळाडू आणि ४ सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे, ज्यामुळे संघात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. या संघाचे नेतृत्वपद बेन स्टोक्सच्या हाती देण्यात आले आहे. तर अनेक असे युवा खेळाडू त्यांना या संघात स्थान देण्यात आले आहे. परंतु संघातील दिग्गज सलामीवीर फलंदाज ऍलेक्स हेल्स याच्यावर पुन्हा एकदा दुर्लक्ष केले गेले आहे. ज्यामुळे माजी इंग्लिश क्रिकेटपटूने ट्विट करत निराशा व्यक्त केली आहे.

बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या या संघात जेम्स विंस, डेविड मालन आणि बेन डकेट यांना संधी देण्यात आली आहे. परंतु संघातील विस्फोटक फलंदाज ऍलेक्स हेल्सला यावेळी देखील संघात स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे माजी इंग्लिश कर्णधार माइकल वॉन यांनी ट्विट करत निराशा व्यक्त केली आहे.

त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, “तर, ऍलेक्स हेल्स नाही. हा त्याच्या कारकीर्दीचा अंत आहे. मी त्याच्यासाठी खूप दुःखी आहे. कारण चुकी केल्यानंतर त्याला शिक्षेचा सामना करावा लागला आहे. परंतु त्याला अजूनही एकही संधी मिळाली नाही. आपण प्रत्येक आठवड्यात चुकी करत असतो. जे म्हणतात की, आम्ही चुका करत नाही ते खोटे बोलत असतात.”(Micheal Vaughan says Alex Hales international career is over)

https://twitter.com/MichaelVaughan/status/1412358174863147012?s=19

ऍलेक्स हेल्सला संधी मिळत नसल्यामुळे चाहतेही भलतेच निराश झाले आहेत. अनेकांनी तर ऍलेक्स हेल्सने निवृत्ती जाहीर करावी असा सल्ला देखील दिला आहे.

ऍलेक्स हेल्स तुफान फॉर्ममध्ये
संघात कुठल्या खेळाडूला स्थान दिले जाईल हे त्याच्या कामगिरीवर अवलंबून असते. मात्र ऍलेक्स हेल्सच्या बाबतीत असे घडताना दिसून आले नाही. गेल्या २ वर्षांपासून त्याला संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. तो गेली २ वर्ष जगभरातील टी-२० लीग स्पर्धांमध्ये धावांचा पाऊस पाडतोय. सध्या तो इंग्लंडमध्ये टी-२० लीग स्पर्धा खेळत आहे. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत चौथ्या क्रमांकावर आहे. त्याने ११ डावात ४७ च्या सरासरीने ३८५ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १७ षटकार आले आहेत.

तसेच बिग बॅश लीग स्पर्धेत त्याने सिडनी थंडर संघासाठी खेळताना सर्वाधिक ५४३ धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याने ३० षटकार लगावले होते. तसेच त्याने आपल्या टी-२० कारकिर्दीत ५ शतके देखील लगावली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

फक्त आणि फक्त एवढ्या रुपयांत धोनीने खरेदी केली होती पहिली बाईक

सुट्टीतही कर्णधार कोहलीचे ‘मिशन इंग्लंड’वर लक्ष, वजनदार डंबल्स उचलत केली कसरत

श्रीलंकेहून आली आनंदाची बातमी, हार्दिक पंड्या ‘बहुप्रतिक्षित’ भूमिकेत मैदानावर उतरणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---