इंडियन प्रीमियर लीग २०२१ स्पर्धेतील प्लेऑफ सामन्यांना लवकरच प्रारंभ होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर यूएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी शार्दुल ठाकूरची राखीव खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान त्याची आयपीएल स्पर्धेतील कामगिरी पाहता तो मुख्य संघात स्थान मिळवू शकतो, असा विश्वास इंग्लंडच्या माजी कर्णधारांनी व्यक्त केला आहे.
येत्या १७ ऑक्टोबरपासून आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. या संघातील काही खेळाडू आयपीएल स्पर्धेत साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरले आहेत. तरी देखील बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, या संघात कुठलाही बदल केला जाणार नाही.
मात्र इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांना असा विश्वास आहे की, शार्दुल ठाकूरला भारताच्या मुख्य संघात स्थान मिळेल. चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनी, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रींसोबत याबाबत चर्चा करू शकतो, असे त्यांचे म्हणणे.
एमएस धोनी आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या मेंटोरची भूमिका पार पाडणार आहे. त्यामुळे मायकल वॉन यांना वाटते की, आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात एमएस धोनीने शार्दुल ठाकूरला खूप जवळून पाहिले आहे. त्याची कामगिरी पाहता धोनी विश्वचषक स्पर्धेसाठी या वेगवान गोलंदाजाला संधी देण्यात कोहली आणि शास्त्री यांच्याशी बोलू शकतो.
मायकल वॉन यांनी क्रिकबजला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, “भारतीय टी२० संघाचा मेंटोर यष्टीरक्षक आहे. तो सीएसकेचा कर्णधार आहे आणि असेही होऊ शकते की, पुढे जाऊन तो कोहली आणि शास्त्रीला बोलेल की तुम्हाला माहिती आहे. चला आता वेळ आली आहे.” अर्थात अप्रत्यक्षपणे धोनी शार्दुलला मुख्य संघात सहभागी करण्याची शिफारस करेल असे वॉन सांगण्याचा प्रयत्न करत आहेत.
मायकल वॉन यांनी शार्दुल ठाकूरची तुलना इयान बोथमसोबत करत म्हटले की, “तो पुढे जाऊन आपल्या गोलंदाजीमध्ये विविधता आणून फलंदाजांना अडचणीत टाकू शकतो.” शार्दुलने दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध खेळताना ४ षटकात केवळ १३ धावा खर्च करत २ गडी बाद केले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
क्रिकेटपटू, यष्टीरक्षक आणि कर्णधारानंतर एमएस धोनी दिसणार अभिनेत्याच्या भूमिकेत? दिले ‘असे’ उत्तर
आयपीएल २०२१च्या दुसऱ्या टप्प्यातील ‘व्हायरल गर्ल’, तमन्ना ते काव्यासारख्या सौंदर्यवतींचा समावेश
‘खेळपट्टी किंवा नाणेफेक नाही तर पराभवामध्ये दोष आमचाच’, संघ निर्देशकाची प्रामाणिक कबुली