भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान नुकतीच कसोटी मालिका संपली असून या मालिकेत भारतीय संघाने 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ऐतिहासिक मालिका विजयानंतर भारतासमोर मायदेशात इंग्लंडचे आव्हान असणार आहे. जवळजवळ चार वर्षानंतर इंग्लंडचा संघ भारतात कसोटी मालिका खेळणार असून सर्व क्रिकेट रसिकांचे लक्ष या मालिकेकडे वळले आहे. अशातच इंग्लंडचे माजी कर्णधार मायकल वॉन यांनी भारत-इंग्लंड मालिकेची भविष्यवाणी केली असून, विशेष म्हणजे त्यांनी या मालिकेत भारतीय संघ विजयी होणार असल्याचे मत मांडले आहे.
मायकल वॉन यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंट वरून भारतीय संघ 3-0 ने मालिका जिंकणार असल्याचे स्पष्ट केले आहे. सर्व क्रिकेट प्रेमींना माहीतच असेल की वॉन यांनी भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघ 4-0 ने मालिका जिंकेल असे वक्तव्य केले होते. मात्र भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत वॉन यांचा हा अंदाज चुकीचा ठरवला होता. यानंतर वॉन यांना मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागले.
It will be 3-0 to India 👍 https://t.co/zKjGMR1zud
— Michael Vaughan (@MichaelVaughan) January 20, 2021
इंग्लंड संघ आगामी 5 फेब्रुवारीपासून भारतात 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. श्रीलंकेत कसोटी मालिका खेळल्यानंतर इंग्लंडचा संघ भारतात येणार आहे. भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेची सुरुवात चेन्नई येथे होणार आहे. इंग्लंडने नुकत्याच श्रीलंका विरुद्ध झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शानदार कामगिरी करत 7 विकेटने विजय मिळवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
राम मंदीर उभारणीसाठी गौतम गंभीरचा हातभार; दिली ‘एवढ्या’ रुपयांची देणगी
ना ट्विट ना वक्तव्य, ‘त्या’ खास कामगिरीनंतर द्रविड-लक्ष्मण यांचा विहारीला थेट ‘पर्सनल मॅसेज’
कसोटी मालिकेआधी इंग्लंडच्या कर्णधाराने टीम इंडियावर उधळली स्तुतीसुमने, म्हणाला…