---Advertisement---

आयपीएलमध्ये यापूर्वीही असं अनेकदा घडलंय…

On: रविवार, मे 1, 2022 7:02 PM
MS-DHoni-Ravindra-Jadeja
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगाम सुरू होण्यापूर्वीच चेन्नई सुपर किंग्स संघाने सर्वांना मोठा धक्का दिला होता. संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने कर्णधारपद सोडत ही जबाबदारी रविंद्र जडेजा याच्याकडे सोपवली होती. मात्र, जडेजाने ८ सामन्यांत नेतृत्व केल्यानंतर वैयक्तिक कामगिरीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा एमएस धोनीकडे उर्वरित आयपीएल २०२२ हंगामासाठी चेन्नईने कर्णधारपद सोपवले. 

दरम्यान, जडेजा आयपीएल हंगाम सुरू असतानाच मध्येच कर्णधारपद सोडणारा पहिला कर्णधार नाही. यापूर्वीही जवळपास प्रत्येक हंगामात वेगवेगळ्या संघाबाबत असे पाहायला मिळाले आहे. याबद्दलच आढावा घ्यायचा झाला तर, २००८ साली डेक्कन चार्जर्स संघाचे कर्णधारपद सुरुवातीला व्हीव्हीएस लक्ष्मणने सांभाळले होते, पण त्याला दुखापत झाल्याने त्याच हंगामात ऍडम गिलख्रिस्टने डेक्कनचे नेतृत्व केले. तसेच २००९ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचे कर्णधारपद सुरुवातीला केविन पीटरसनने सांभाळले, तसेत याच हंगामात नंतर अनिल कुंबळेने बेंगलोरच्या नेतृत्वाची धुरा हाती घेतली.

साल २०१२ मध्ये दोन संघाबाबत असे पाहण्यात आले. पहिले म्हणजे रॉयस चॅलेंजर्स बेंगलोर संघाने हंगामादरम्यानच डॅनिएल विट्टोरीकडून विराट कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. तसेच त्याचवर्षी कुमार संगकाराकडून हंगाम सुरू असतानाच कॅमेरॉन व्हाईटने डेक्कन चार्जर्सची कर्णधारपदाची जबाबदारी घेतली होती.

आयपीएल २०१३ मध्ये देखील दोन संघांत कर्णधारपद बदलाची घटना घडल्या. मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्वपद हंगामाच्या अर्ध्यावरून रिकी पाँटिंगकडून रोहित शर्माकडे देण्यात आले. तसेच पुणे वॉरियर्स इंडिया संघाचेही अँजेलो मॅथ्यूजने अर्ध्यातून कर्णधारपद सोडले. त्यामुळे ऍरॉन फिंचने कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर २०१४ साली सनरायझर्स हैदराबादच्या नेतृत्वपदाची जबाबदारी शिखर धवनकडून डॅरेन सॅमीने घेतली होती. २०१५ साली शेन वॉटसनने स्टीव्ह स्मिथकडे अर्ध्यातूनच वैयक्तिक कामगिरीवर लक्ष्य केंद्रित करण्यासाठी राजस्थान रॉयल्सचे कर्णधारपद सोपवले होते.

तसेच २०१६ साली किंग्स इलेव्हन संघाची कामगिरी सुरूवातीला चांगली झाली नाही म्हणून डेव्हिड मिलरने हंगामाच्या अर्ध्यातूनच मुरली विजयकडे कर्णधारपदाची धुरा सोपवली होती, तर २०१८ साली अशाच कारणामुळे गौतम गंभीरने दिल्ली कॅपिटल्स संघाचे कर्णधारपद श्रेयस अय्यरकडे हंगामाच्या अर्ध्यातून सोपवले होते.

त्यानंतर २०२० साली दिनेश कार्तिकने अर्ध्यातून कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद सोडले होते. त्याच्याऐवजी ओएन मॉर्गनकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. २०२१ साली सनरायझर्स हैदराबादची कामगिरी खालावली होती. त्यामुळे डेव्हिड वॉर्नरकडून हैदराबादची नेतृत्वाची जबाबदारी काढून घेत ती केन विलियम्सनकडे सोपवली. आता यानंतर २०२२ मध्ये पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सच्या बाबतीत असे घडले आहे की, हंगामाच्या अर्ध्यातूनच एखाद्या खेळाडूने कर्णधारपद सोडले आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

पुन्हा तळपली केएल राहुलची बॅट, दिल्लीच्या गोलंदाजांचा समाचार घेतल्यानंतर ट्वीटरवर प्रतिक्रियांचा पूर

रोहितची विकेट पडल्यावर ढसाढसा रडली पत्नी रितिका

‘त्याला कर्णधार बनवलेच कशासाठी…’, जडेजाने नेतृत्व सोडल्यानंतर भारताच्या दिग्गज कर्णधाराने साधला निशाणा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---