लखनऊ सुपरजायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रविवारी (०१ मे) आयपीएल २०२२मधील ४५वा सामना खेळवला गेला. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेला हा सामना अतिशय रोमांचक राहिला. लखनऊ संघाने सुरुवातीपासूनच सामना आपल्या ताब्यात घेतला. पुन्हा एकदा लखनऊकडून कर्णधार केएल राहुल याने शानदार खेळ दाखवला आणि संघाला मजबूत स्थितीत आणले. यानंतर सोशल मीडियावर त्याच्या खेळीचे कौतुक होत आहे.
नाणेफेक जिंकून लखनऊने (Lucknow Super Gaints) या सामन्यात प्रथम फलंदाजी निवडली. लखनऊकडून क्विंटन डी कॉक आणि राहुल (KL Rahul) सलामीला फलंदाजीसाठी उतरले. दोघांनी मिळून संघाला चांगली सुरुवातही करून दिली. परंतु ४२ धावांची भागीदारी रचल्यानंतर शार्दुल ठाकूरने ललित यादवच्या हातून डी कॉकला झेलबाद करत त्यांची भागीदारी मोडली.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पुढे राहुलने दीपक हुड्डाला साथीला घेत राहुलने संघाचा डाव पुढे नेला. त्याने १५०.९८ च्या स्ट्राईक रेटने ५१ चेंडू खेळताना ७७ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याच्या बॅटमधून ५ षटकार आणि ४ चौकार निघाले. त्याच्या या खेळीच्या जोरावर लखनऊने २० षटकांमध्ये १९५ धावा फलकावर लावल्या.
त्याच्या या खेळीनंतर ट्वीटरवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया (Fans Praised KL Rahul) उमटत आहेत. अनेकांनी राहुलला आगामी टी२० विश्वचषक २०२२ साठी प्रबळ दावेदार म्हटले आहे.
Another great innings by Captain K L Rahul ????????#IPL2022 #DCvLSG #KLRahul pic.twitter.com/s3IsAEJwZf
— Rahulraj⚡ (@RahulrajRout) May 1, 2022
Powerplay game of KL Rahul is slow run a ball type in every match he played in this ipl on the other hand kohli and Rohit are soo good in SR in powerplay especially in aus rahul failed with new ball in white ball series
So rohit kohli should open & Rahul at 3@vikrantgupta73
— Vitamin Protein (@CricketIsLove7) May 1, 2022
All these years we have seen @klrahul11 performing in the IPL, can we now call him Mr. IPL !! @bhogleharsha #TATAIPL #LSGvsDC
— Aslam Faiyaz ????️ (@faiyaz_aslam) May 1, 2022
Brilliant knock @klrahul11#LSGvDC pic.twitter.com/ntnhb8SDtJ
— Debojit Nath (@nathdebojit24) May 1, 2022
Well played, Captain KL Rahul – 77 runs from 51 balls, he has been consistent for Lucknow with 400 runs including 2 hundreds and 2 fifities in #IPL2022. pic.twitter.com/j0HUvvHKeH
— Johns. (@CricCrazyJohns) May 1, 2022
A good innings from the skipper KL Rahul – 77 (51). Stayed till the 19th over. He's been in terrific form over the years in the IPL, sheer consistency. pic.twitter.com/N0wOaskS4D
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) May 1, 2022
Every Rahul is slowly becoming Achievers Except One.. ????
@klrahul11 @rahultewatia02
— SUDHIR MISHRA (@SHAHSUDH) May 1, 2022
— . (@Dhanushvk_) May 1, 2022
या खेळीसह आयपीएल २०२२मध्ये राहुलच्या ४५० धावा पूर्ण झाल्या आहेत. १० सामने खेळताना त्याने ४५१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून २ शतके आणि २ अर्धशतके निघाली आहेत.
असे आहेत दोन्ही संघ-
दिल्ली कॅपिटल्स– पृथ्वी शॉ, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, रिषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), ललित यादव, रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, मुस्तफिजुर रहमान, चेतन साकारिया
लखनऊ सुपर जायंट्स– क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), केएल राहुल (कर्णधार), दीपक हुड्डा, मार्कस स्टॉयनिस, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, कृष्णप्पा गौतम, जेसन होल्डर, दुष्मंता चमीरा, मोहसिन खान, रवी बिश्नोई
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सोप्पं नाहीये हे! ८ सामन्यानंतरच जडेजाने का उतरवला कर्णधारपदाचा ‘काटेरी मुकूट’? जाणून घ्या ३ कारणे
एकाच षटकात ५५ धावा चोपणारा ‘हा’ फलंदाज इंग्लंडच्या संघात करणार कमबॅक, संपणार ३ वर्षांची प्रतिक्षा