सध्या भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील दोन सामने पूर्ण झाले असून त्यात न्यूझीलंडने विजय मिळवत मालिका जिंकली आहे. आता मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी 1 नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या कसोटीबाबत टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट म्हणाले की, विराट कोहली, रोहित शर्मा, रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांसारख्या खेळाडूंसाठी ही शेवटची घरची कसोटी असू शकते.
जॉन राइटने ‘एक्स’वर पोस्ट करून रोहित, विराट, जडेजा आणि अश्विनबद्दल बोलले. तो म्हणाला की, या सर्व महान खेळाडूंसाठी मुंबईत एकत्र खेळलेली कसोटी ही घरच्या मैदानातील शेवटची कसोटी असू शकते. राईटची पोस्ट एक गोष्ट स्पष्ट होत आहे की, न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत होणाऱ्या कसोटीनंतर काही वरिष्ठ खेळाडूंना टीम इंडियातून वगळले जाऊ शकते. तसेच या मालिकेनंतर भारतीय संघ घरची कसोटी तब्बल एका वर्षानंतर खेळणार आहे. अश्या स्थितीत आगामी दिवसांमध्ये टीम इंडियामध्ये काय घडेल? हे सांगता येणे अवघड आहे.
जॉन राईटने आपल्या एक्स-पोस्टमध्ये लिहिले की, “मुंबईत शुक्रवारपासून सुरू होणारी ही कसोटी रोहित, विराट, अश्विन आणि जडेजा या महान खेळाडूंसाठी भारताचे एकत्र प्रतिनिधित्व करण्यासाठी शेवटची घरची कसोटी ठरू शकते.”
Might be the last home test match starting Friday in Mumbai of the greats Rohit Virat Ashwin & Jadeja representing India together #INDvNZ
— John Wright (@johnwright15) October 29, 2024
न्यूझीलंडविरुद्धची कसोटी मालिका गमावून टीम इंडियाने 12 वर्षांपासून सुरू असलेला विक्रमही गमावला. 2024 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका गमावण्यापूर्वी, भारतीय संघाने 2012 मध्ये घरच्या मैदानावर शेवटची कसोटी मालिका गमावली होती. 2012 ते 2024 पर्यंत टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग 18 कसोटी मालिका जिंकल्या. आता टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध मुंबईत होणारी तिसरी कसोटी कोणत्याही किंमतीत जिंकायची आहे. मालिका गमावल्यामुळे टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचणे कठीण दिसत आहे.
हेही वाचा-
IND VS NZ; मुंबई कसोटीत विराट कोहली राहुल द्रविडचा हा मोठा विक्रम मोडणार
गुजरात टायटन्सनं शमीला रिटेन केलं नाही? शुबमन गिलसह हे दोन खेळाडू संघात कायम!
IND vs AUS: रोहित-विराट नाही तर हा खेळाडू रिकी पाँटिंगचा आवडता