---Advertisement---

सलग २ हंगामात फ्लॉप ठरलेल्या ‘मॅक्सभाऊ’साठी आरसीबीने का मोजले १४.२५ कोटी? ऐका ‘राज की बात’

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 1:40 PM
---Advertisement---

जगातील सर्वोत्तम क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठी सर्वच संघांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. या स्पर्धेचा शुभारंभ ९ एप्रिल रोजी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन्ही संघाच्या सामन्याने होणार आहे. त्यामुळे आरसीबी संघातील खेळाडू मैदानावर घाम गाळताना दिसून येत आहे. यंदा आरसीबी संघाकडून ग्लेन मॅक्सवेल देखील खेळणार आहे. या संघात त्याची भूमिका काय असणार आहे? याचा खुलासा माईक हेसन यांनी केला आहे.

आयपीएल २०२१ साठी झालेल्या लिलावात, आरसीबी संघाने मोठा डाव खेळत ग्लेन मॅक्सवेल याला तब्बल १४.२५ कोटींची किंमत मोजत आपल्या संघात समाविष्ट करून घेतले होते. त्यामुळे आरसीबी संघाला त्याच्याकडून जास्तीच्या अपेक्षा असणार आहेत. आयपीएल २०२० मध्ये मॅक्सवेल पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. तआयपीएल २०१९ मध्येही त्याची फलंदाजी विशेष राहिली नव्हती. तरीदेखील आरसीबी संघाने त्याला मोठी रक्कम खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. यामुळे चाहत्यांनी निराशा व्यक्त केली होती.

त्याची या संघात काय भुमिका असणार आहे? याबाबत प्रशिक्षक माईक हसन यांनी खुलासा करत म्हटले आहे की, “तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे, आम्हाला मधल्या षटकांमध्ये त्याची आवश्यकता आहे. तसेच त्याच्याकडे भरपूर अनुभव आहे. जर हा खेळाडू फॉर्ममध्ये असेल तर तो एकट्याच्या जीवावर सामना जिंकवू शकतो. त्याच्या क्षमतेचा आम्हाला पुरेपूर वापर करून घ्यायचा आहे. आम्हाला हे पाहायचं आहे की, तो ही जबाबदारी कशी पार पाडतो. मी त्याच्यासोबत बोलणार आहे आणि त्याला त्याची भूमिका काय असेल हे समजवणार आहे.”

आयपीएल २०२० मध्ये ग्लेन मॅक्सवेलची निराशाजनक कामगिरी

ग्लेन मॅक्सवेलला आयपीएल २०२० मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब संघाने तब्बल १०.७५ कोटी खर्च करत आपल्या संघात स्थान दिले होते. या स्पर्धेत त्याने ११ सामन्यात १४.५७ च्या सरासरीने अवघ्या १०८ धावा केल्या होत्या. त्यामुळे पंजाब संघाने त्याला रिलीज केले होते. यंदा आरसीबी संघाच्या चाहत्यांना मॅक्सवेलकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

आयपीएल २०२१ साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ

विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, जोश फिलिप (यष्टीरक्षक), एबी डिविलियर्स (यष्टीरक्षक), पवन देशपांडे, वॉशिंग्टन सुंदर, डेनियल सॅम्स, युजवेंद्र चहल, एडम झंपा, शाहबाज अहमद, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, केन रिचर्डसन, हर्षल पटेल, ग्लेन मॅक्सवेल, सचिन बेबी, रजत पाटीदार, मोहम्मद अजहरुद्दीन, काइल जॅमीसन, डॅनियल क्रिश्चियन, सुयश प्रभुदेसाई आणि केएस भारत.

महत्त्वाच्या बातम्या-

अरेरे! युवराजने ६ संघ बदलले, मात्र ‘या’ जिगरी मित्रांसोबत आयपीएल खेळण्याचे सौभाग्य नाही लाभले

नादच खुळा! खेळाडूने झेल टिपण्यासाठी मारली अद्भुत डाईव्ह; तुम्हालाही बसणार नाही डोळ्यांवर विश्वास

परदेशात पहिल्यांदा कसोटी विजयाची पताका झळकावणारे अजित वाडेकर, वाचा त्यांच्याबद्दल माहित नसलेल्या गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---