---Advertisement---

अरेरे! युवराजने ६ संघ बदलले, मात्र ‘या’ जिगरी मित्रांसोबत आयपीएल खेळण्याचे सौभाग्य नाही लाभले

On: गुरूवार, एप्रिल 1, 2021 1:00 PM
---Advertisement---

टी२० क्रिकेटमध्ये भारताचा पहिला सुपरस्टार म्हणून युवराज सिंगकडे पाहिले जाते. भारतीय संघाने २००७ मध्ये जिंकलेल्या टी२० विश्वचषकात भारतीय संघाला विजयी करण्यात त्याचा सिंहाचा वाटा होता. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात ६ षटकार ठोकून विश्वविक्रम केलेला. तो तब्बल १८ वर्ष भारतीय संघाचा एक प्रमुख भाग होता.

दरम्यान युवराज आयपीएलचे १२ हंगामही खेळला आहे. त्यात तो बऱ्याच संघांकडून खेळला. २००८ ते २०१० पर्यंत किंग्ज इलेव्हन पंजाब, २०११ ते२०१३ पुणे वॉरिअर्स इंडिया, २०१४ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, २०१५ दिल्ली डेअरडेविल्स, २०१६ आणि २०१७ सनरायजर्स हैद्राबाद, २०१८ किंग्स इलेव्हन पंजाब आणि २०१९ मध्ये मुंबई इंडियन्स अशा विविध संघांचे त्याने प्रतिनिधित्व केले. त्यात त्याने १३२ सामन्यांत २७५० धावा केल्या आहेत.

युवराज संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत ६ वेगवेगळ्या संघांकडून व शेकडो सहकार्‍यांसह खेळला. मात्र, आपल्या तीन जिगरी मित्रांसोबत एकाच आयपीएल संघातून खेळण्याची त्याला कधीही संधी मिळाली नाही. आज आपण युवराजच्या अशाच तीन जिगरी मित्रांविषयी जाणून घेणार आहोत, ज्यांच्यासोबत आयपीएलमध्ये खेळण्याचे सौभाग्य त्याला लाभले नाही.

एमएस धोनी
भारतीय क्रिकेट संघासाठी खेळताना युवराज आणि एमएस धोनीने बरेच सामने जिंकून दिले आहेत. ही जोडी जेव्हा मैदानात असायची, तेव्हा सर्वांना वाटायच, की भारताला विजय नक्की मिळणार. मात्र, चाहते इतक्या यशस्वी जोडीला आयपीएलमध्ये कधीही एकाच संघाकडून खेळताना पाहू शकले नाहीत. युवराज ६ संघांसाठी तर, धोनी २ संघांसाठी आयपीएल खेळला आहे.

विरेंद्र सेहवाग
युवराज आणि विरेंद्र सेहवाग २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ वनडे विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. दोघेही दिल्ली आणि पंजाबसाठी आयपीएल खेळले आहेत. मात्र, ते कधीही सोबत खेळू शकले नाहीत. २०१८ ला युवराज पंजाब संघाचा सदस्य झाला. पण, त्यावेळी सेहवाग मात्र संघाचा मार्गदर्शक होता. त्यामुळे, हे दोघेही एकत्रित आयपीएल खेळू शकले नाहीत.

हरभजन सिंग
युवराजचा सर्वात जवळचा मित्र असलेला हरभजन सिंग हा देखील कधीही युवराजसोबत एकत्रितरीत्या आयपीएलचा सामना खेळला नाही. हरभजन २००८ ते २०१७ या काळात मुंबई इंडियन्सचा महत्त्वपूर्ण सदस्य होता. या काळात युवराज सिंग पाच विविध संघांसाठी खेळला. २०१८ मध्ये हरभजन सिंग मुंबई सोडून चेन्नईमध्ये सामील झाल्यानंतर, २०१९ आयपीएल हंगामात युवराज मुंबई इंडियन साठी खेळताना दिसला. त्यामुळे या दोघांना एकाच आयपीएल संघात खेळण्याची कधीही संधी मिळाली नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

आयपीएलमध्ये यष्ट्यांमागे ‘सुपरमॅन’ असलेले ३ भारतीय विकेटकिपर

एकमेव खेळाडू ज्याने तब्बल ६ वेळा केला आयपीएलच्या अंतिम सामन्यात पराभवाचा सामना

आयपीएलमध्ये ज्या संघाकडून खेळले, त्याच संघाचे महागुरू झालेले ५ दिग्गज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---