ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आहे. मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने जिंकून भारताने आघाडी घेतलीये. तर एक सामना ऑस्ट्रेलिया जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. या तीनही सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी अनुभवी फिरकीपटू नॅथन लायन याने सर्वोत्तम कामगिरी करून दाखवली. त्याचवेळी लायनने आता भविष्यात आणखी किती वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू माईक हसी याने एक वक्तव्य केले आहे.
नॅथन लायन याच्याकडून ऑस्ट्रेलियन संघाला या दौऱ्यावर मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, नागपुर येथे झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात तो अपयशी ठरला. त्याला एकाच डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याने फक्त एक बळी मिळवलेला. त्यानंतर दिल्ली व इंदोर येथील कसोटीत मिळून त्याने तब्बल 18 बळी आपल्या नावे केले. त्याचा हाच फॉर्म पाहता त्याने आणखी किती वेळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळावे असा प्रश्न हसी याला विचारला गेला. त्यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“माझे प्रामाणिक उत्तर असेल त्याची इच्छा आहे तोपर्यंत त्याने खेळावे. कारण, तो आत्ता तंदुरुस्त दिसत आहे. त्याचा फॉर्मही चांगला आहे. असे म्हटले जाते की फिरकीपटू वयाच्या तिशीनंतर सर्वोत्तम फॉर्ममध्ये येतो. ही एक कठीण कला आहे. त्याने आणखी नक्कीच खेळायला हवे.”
लायन याने दिल्ली कसोटीत 8 बळी आपल्या नावे केलेले. तर, इंदोर कसोटीत पहिला डावात दोन आणि दुसऱ्या डावात तब्बल आठ बळी घेण्याची कामगिरी त्याने केली. या मालिकेत त्याला पदार्पण करणारे दोन्ही फिरकीपटू टॉड मर्फी व मॅथ्यू कुन्हमन यांचे तितकेच मोलाचे सहकार्य लाभत आहे. या दोघांनी देखील प्रत्येकी एक पंचक आपल्या नावे केलेय.
(Mike Hussy Suggest How Long Mike Hussy Test Career)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ज्या गावसकरांनी भारतीय क्रिकेटला ओळख मिळवून दिली, त्यांच्या दैदीप्यमान करिअरचा ‘असा’ झाला शेवट, वाचाच
भारतीय क्रिकेटमधील दुर्दैवाचं नाव- पुणेकर वसंत रांजणे, विंडीजविरुद्ध खेळताना रक्ताने माखलेला मोजा