नायजेरियन फुटबॉलपटू मिकेल जॉन ओबी याच्या वडिलांचा अर्जेंटिना विरूद्ध सामन्याच्या काही वेळापूर्वी अपहरण करण्यात आले होते. जर त्याने याबाबत पोलिसांना कळवले तर त्यांना मारण्यात येईल हे पण अपहरणकर्त्याने सांगितले.
26 जूनला नायजेरीयाचा साखळी फेरीतील हा शेवटचा सामना अर्जेंटिना विरूद्ध होता.
हा सामना सुरू होण्यापूर्वी नायजेरियाचा कर्णधार ओबी हा संघासोबत सेंट पीटर्सबर्गला रवाना होताना त्याला ही माहिती कळली. त्यांच्या कुटूंबाने दिलेल्या अपहरणकर्त्याच्या फोन नंबरवर त्याने फोन केला असता त्याच्याकडून खंडणीची मागणी केली गेली.
याबद्दल ओबीने नायजेरियन फुटबॉल फेडरेशनला सांगितले नाही कारण त्याला सामना सुरु होण्याआधी कोणाचे लक्ष विचलीत करायचे नव्हते.
ओबीचे वडील पा मायकल ओबी यांचे दक्षिण-पूर्व नायजेरिया या भागातून अपहरण करण्यात आले होते. तेथील पोलिसांनी त्यांची लगेचच सुखरूप सुटका केली.
दुसऱ्यांदा ओबीचे वडीलांचा अपहरण
— Mikel John Obi (@mikel_john_obi) July 3, 2018
पण त्याच्या वडिलांना त्या आठवडाभरात खूप त्रास दिला गेला. तसेच सध्या ते हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत असे ओबीने सांगितले. 2011च्या ऑगस्टनंतर दुसऱ्यांदा ओबीचे वडीलांचा अपहरण होत आहे.
अंगावर ओढवलेले हे संकट ओबीने बाजूला ठेवून तो अर्जेंटिना विरूद्ध सामन्यात पूर्ण 90 मिनीटे खेळला. 1-1 असे बरोबरीत असताना अर्जेंटिनाच्या मार्कस रोजोने 86व्या मिनीटाला केलेल्या गोलने नायजेरिया फिफामधून बाहेर पडला.
“माझ्या वडिलांचे अपहरण झाले असता मी संघात खेळत होतो. 4 तासाआधीच मला हि माहीती कळाली होती. त्यावेळी मी खूप चिंतेत होतो,” असे ओबी म्हणाला.
“मला काहीच सूचत नव्हते काय करावे ते पण 180 मिलीयन नायजेरियन जनतेसाठी खेळायचेच होते. तसेच मी केले डोक्यातून तो विचार काढून टाकला आणि आपल्याला फक्त देशासाठी खेळायचे आहे,” असेही तो पुढे म्हणाला.
जर हा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला असता तर ते बाद फेरीसाठी पात्र ठरले असते.
महत्त्वाच्या बातम्या-
–फिफा विश्वचषक: इंग्लंडने विश्वचषकातून कोलंबियाला केले शूट आउट
–फिफा विश्वचषक: ब्राझिलने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करताच केला खास पराक्रम