---Advertisement---

पहिल्या वनडेत क्लासेन-मिलर शो! टीम इंडियासमोर विजयासाठी 250 धावांचे आव्हान

On: गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022 7:05 PM
---Advertisement---

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानचा पहिला वनडे सामना गुरूवारी (6 ऑक्टोबर) लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर सुरू झाला. या मालिकेत भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थित शिखर धवन संघाचे नेतृत्व करतोय. या सामन्यात शिखरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पावसामुळे प्रत्येकी 40 षटकांच्या केलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने शानदार फलंदाजी करत 4 बाद 249 धावा धावफलकावर लावल्या. डेव्हिड मिलर व हेन्रिक क्लासेन यांची अर्धशतके दक्षिण आफ्रिकेच्या डावाची वैशिष्ट्ये ठरली.

 

प्रथम फलंदाजी संधी मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेसाठी जानेमन मलान व क्विंटन डी कॉक यांनी 49 धावांची सलामी दिली. मलान बाद झाल्यानंतर कर्णधार टेंबा बवुमाही फारसा टिकू शकला नाही. ऐडन मार्करम खातेही न खोलता तंबूत परतला. दुसऱ्या बाजूने सलामीवीर डी कॉक याने डाव सावरून धरला होता. रवी बिश्नोईच्या गोलंदाजीवर बाद होण्यापूर्वी त्याने 54 चेंडूवर 48 धावांची खेळी केली.

डी कॉक बाद झाल्यानंतर अनुभवी डेव्हिड मिलर आणि हेन्रिक क्लासेन यांनी दाबाची सूत्रे हाती घेत भारतीय गोलंदाजांवर प्रतिहल्ला केला. खराब चेंडूंचा समाचार घेत तसेच एकेरी-दुहेरी धावाही काढल्या. त्यांनी शतकी भागीदारी रचली. दोघांनी देखील आपापली अर्धशतके पूर्ण केली.

मिलरने अखेरपर्यंत नाबाद राहत 64 चेंडूवर 6 चौकार व 2 षटकारांसह 74 धावा केल्या. तर बाजूने क्लासेननेही तशाच प्रकारची फलंदाजी करताना 65 चेंडूत 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 74 धावा कुटल्या. भारतासाठी शार्दुल ठाकूरने दोन तर, कुलदीप यादव व रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी एक बळी मिळवला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
INDvSA: ‘विराट कोहली आणि रोहित शर्मा माझे आदर्श’, पहिल्या वनडेपूर्वीच खेळाडूचे मोठे वक्तव्य
पांढरे केस, पांढरे जॅकेट अन् हातात माईक, रिची बेनो बोलायला लागले की, ऐकणाऱ्याचे कान व्हायचे तृप्त

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---