आयपीएल स्पर्धा खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. आयपीएल स्पर्धेमुळे खेळाडूला वेगळी ओळख मिळते. कारण या स्पर्धेत जगातील अनेक दिग्गज खेळाडू सहभाग घेत असतात. त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची आणि अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याची संधी त्यांना मिळते. इतकेच नव्हे तर, या स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्यानंतर युवा खेळाडूंसाठी राष्ट्रीय संघाचे देखील दार उघडे होत असते. त्यामुळे खेळाडू दिवसरात्र मेहनत करत असतात.
परंतु काही वेळेस युवा खेळाडूंकडून पैसे घेऊन त्यांना आयपीएल स्पर्धेत संधी देऊ अशी खोटी आश्वासननेही दिली जातात. अशाच एका घोटाळ्याचा नुकताच पोलिसांनी भांडाफोड केला आहे.
भारतीय क्रिकेटमध्ये एक मोठा घोटाळा समोर आला आहे, ज्यामध्ये खेळाडूंकडून पैसे घेऊन त्यांना आयपीएल स्पर्धेत आणि राज्यातील संघात स्थान देऊ असे खोटे आश्वासन दिले जात होते. या घोटाळ्यात अटक झालेल्या प्रशिक्षक कुलबीर रावत यांनी कबुली दिली आहे की, या घोटाळ्यात त्यांनी ८ ते ९ खेळाडूंकडून पैसे घेतले होते. यादरम्यान त्यांनी सिक्कीम क्रिकेट असोसिएशनचे निवडकर्ते बिकाश प्रधान यांचे देखील नाव घेतले आहे. लवकरच गुरुग्राम पोलिस यांना नोटीस पाठवणार आहेत. तसेच यामध्ये आणखी मोठे नाव समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
‘द ट्रीब्यून’च्या वृत्तानुसार, पोलिसांनी म्हटले आहे की, “चॅटमध्ये यूपी क्रिकेट असोसिएशनचे निवडकर्ते अक्रम खान, उपाध्यक्ष माहिम वर्मा आणि उत्तराखंड क्रिकेट असोसिएशनचे सीईओ अमन यांचा देखील उल्लेख आहे. तसेच त्यांनी असे देखील संकेत दिले आहेत की, त्यांनी अनेकदा युपी आणि उत्तराखंड क्रिकेट संघांद्वारे उमेदवारांची निवड केली आहे. आशुतोष बोरा यांच्या फर्मच्या खात्यातून रावत यांच्या खात्यात ३५ लाखांहून अधिक रक्कम ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. तर बोरा यांच्या खात्यातून २ लाखांहून अधिक रुपये सिक्कीम क्रिकेट असोसिएशनचे निवडकर्ते विकास प्रधान यांना ट्रान्स्फर करण्यात आले आहेत. यासह अरुणाचल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नबाम विवेक यांचा ही या तपासात समावेश असणार आहे.”
गुरुग्राम पोलिसांनी ४ सप्टेंबर रोजी या प्रकरणाचा भांडाफोड केला होता. त्यांनी अनेक युवा खेळाडूंकडून स्पर्धा खेळवण्याचे आमिष दाखवून पैसे घेतले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ३ आरोपींना अटक केले असून आणखी ३ आरोपी फरार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
इशानने सॉलिड षटकार ठोकत जिंकवला सामना, आनंदात हार्दिकचे डोक्यावर चुंबन; व्हिडिओ तुफान व्हायरल
“रिषभ भाग्यशाली आहे कारण पाँटिंग त्याला प्रशिक्षक म्हणून लाभलाय”