कोरोना व्हायरसने अनेक गोष्टींमध्ये बदल घडवून आणला आहे. यात क्रिकेट क्षेत्राचाही समावेश आहे. क्रिकेट पुन्हा रुळावर आणण्यासाठी आयसीसीने नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यात चेंडूवर लाळ वापरण्यास बंदी आहे. पण पाकिस्तानचे प्रशिक्षक मिस्बाह-उल-हकच्या नुसार हा नियम पाळणे गोलंदाजांसाठी अवघड असेल, त्यामुळे त्यांनी मास्क घालावे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली आयसीसी क्रिकेट समितीने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यात सामन्याआधी १४ दिवसाच्या आयसोलेशन ट्रेनिंग कॅम्पचा समावेश आहे. जेणेकरून हे सुनिश्चित केले जाऊ शकते की संघातील सर्व खेळाडू कोविड १९ पासून संरक्षित आहेत. अंतरिम तत्वावर समितीने ही शिफारस केली आहे.
मिस्बाह क्रिकेट बाझ या यूट्यूब चॅनेलवरील मुलाखतीत म्हणाला, ‘गोलंदाजांसाठी लाळेचा उपयोग न करणे हे सोपे असणार नाही. क्रिकेट सुरु झाल्यापासून खेळाडूंना त्याची सवय आहे. जरी खेळाडूंनी नवीन नियम लक्षात ठेवले तरी चुकून एखाद वेळेस त्यांच्याकडून चूक होऊ शकते.’
‘हे थांबवण्यासाठी आपल्याला काहीतरी करावे लागेल. जसे की गोलंदाजांनी मास्क घालावा किंवा काही नवीन प्रतिबंधात्मक संरक्षण असावे जेणेकरून ते लाळ वापरणार नाही.’
आसीसीच्या क्रिकेट समितीने अन्यही काही सुचना खेळाडूंना केल्या आहेत जसे की चेंडूच्या संपर्कात आल्यानंतर हात सॅनिटाईज करणे, खेळाच्या आधी आणि नंतर चेंजिंग रूममध्ये कमीतकमी वेळ घालवणे, वगैरे.
याबद्दल बोलताना मिस्बाहने म्हटले आहे की हे नवीन नियम आत्मसात करायला खेळाडूंना वेळ लागेल. तसेच त्याने असेही म्हटले आहे की यामुळे गोलंदाजांच्या कामगिरीवरही परिणाम होऊ शकतो.
जुलैमध्ये इंग्लंड दौऱ्यावर ३ कसोटी आणि ३ टी२० सामने खेळण्यासाठी पाकिस्तानचा संघ जाणार आहे. त्यासाठी ट्रेनिंग कॅम्पचे आयोजन करण्यावर सध्या मिस्बाह काम करत आहे.
याबद्दल त्याने म्हटले आहे की पाकिस्तानी गोलंदाज एका बाजून चेंडू चमकवण्यासाठी नेहमी लाळेचा उपयोग करतात. त्यामुळे त्यांना इंग्लंडमध्ये थोडे कठीण जाऊ शकते. पण असे असले तरी मिस्बाहने आयसीसीच्या क्रिकेट समीतीने केलेल्या नवीन नियमांना पाठिंबाही दिला आहे. त्याने म्हटले आहे की या परिस्थितीत आवडले किंवा नाही आवडले तरी त्याचा स्विकार केला पाहिजे.
ट्रेेंडिंग घडामोडी –
केवळ ८ वर्षांचा असल्यापासून ‘या’ खेळाडूला सचिन करतोय मार्गदर्शन, आज आहे टीम इंडियाचा स्टार
मलाही भारतीय टी-२० संघात घ्या; निवड समितीकडे ‘हा’ ४० वर्षीय अनुभवी खेळाडू करतो याचना
‘आयपीएलमधील तो क्षण स्वप्न पूर्ण करणारा होता’