शेरे-बांगला-स्टेडियमवर शुक्रवारी (06 ऑगस्ट) खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात बांगलादेशने ऑस्ट्रेलियाचा 10 धावांनी पराभव केला आहे. यासह बांगलादेशने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. बांगलादेशने क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारच्या द्विपक्षीय मालिकेत ऑस्ट्रेलियाचा पराभव करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मिशेल मार्शने ऑस्ट्रेलियासाठी अर्धशतक झळकावले. परंतु तो आपल्या संघाला मालिका गमावण्यापासून वाचवू शकला नाही. त्याचवेळी, ऑस्ट्रेलियन संघ जेव्हा बांगलादेशच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करत होता; या दरम्यान एक स्लेजिंगची घटना घडली, ज्याची सामना संपल्यानंतर खूप चर्चा झाली.
जेव्हा मिशेल मार्श फलंदाजी करत होता, तेव्हा बांगलादेशचा वेगवान गोलंदाज शोरीफुल इस्लाम खूप स्लेजिंग करताना दिसला. त्यातही इस्लामने डावातील 18 वे षटक टाकताना पहिल्याच चेंडूवर संघसहकारी मोहम्मद नईमच्या हातून मार्शला झेलबाद केले. ज्याच्या विकेटची बांगलादेश संघाला प्रतिक्षा होती, त्याच फलंदाजाची आपण विकेट घेतल्याचा आनंद त्याला अनावर झाला.
मार्शची विकेट घेतल्यानंतरतो मर्यादा ओलांडून आक्रमकपणे जल्लोष साजरा करताना दिसला. इतकेच नव्हे तर मार्श बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनकडे जात असतानाही इस्लामने त्याच्यासमोर येऊन त्याला स्लेजिंग केले. एकंदरीत, असे म्हणता येईल की इस्लाम अतिउत्साहात आपला विवेक गमावतांना दिसला. या कृत्यामुळे सोशल मीडियावर क्रिकेटरसिकांनी त्याच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे या बांगलादेशी गोलंदाजाला खूप ट्रोल केले जात आहे.
Shoriful islam vs mitchell marsh pic.twitter.com/zVRPsx36SV
— Shubham Sharma (@Shubham73106588) August 6, 2021
या सामन्यात इस्लामने बांगलादेशकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. मार्शव्यतिरिक्त त्याने ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज मोइजेस हेन्रिक्स यालाही झेलबाद केले होते. हेन्रिक्स केवळ 2 धावा करून बाद झाला होता. तर मार्श हा ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज होता. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत संघासाठी 51 धावांची खेळी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
शाकिब अल हसनचा अद्भुत विक्रम; टी२०त ‘अशी’ कामगिरी करणारा बनला जगातील पहिला क्रिकेटपटू
श्रीलंका टू इंडिया, कोरोनामुक्त झाल्यानंतर चहल अन् गौतम सुखरुप परतले मायदेशी
त्या राहुल सारखाच हा राहुल आहे; ‘या’ दिग्गज गोलंदाजाने द्रविडशी केएलची केली तुलना