---Advertisement---

मिचेल मार्शला केवळ फलंदाजी करण्याची परवानगी! IPL मध्ये गोलंदाजीसाठी ऑस्ट्रेलियाचा ब्रेक?

On: मंगळवार, मार्च 25, 2025 6:20 PM
---Advertisement---

सोमवार 24 मार्च रोजी आयपीएल स्पर्धेतील दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीने लखनऊ संघाचा 1 विकेटने पराभव केला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा शानदार अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शने लखनऊला मोठी धावसंख्या करण्यात मोठे योगदान दिले. मार्शने 36 चेंडूत 72 धावा केल्या. या दरम्यान त्याने 6 चौकार आणि 6 षटकार झळकावले. त्याने फलंदाजी मध्ये तर शानदार प्रदर्शन केलं पण तो गोलंदाजी करू शकला नाही. पण मिचेल मार्शने गोलंदाजी का केली नाही चला तर जाणून घेऊया.

मिचेल मार्श मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कमरेच्या दुखापतीने त्रस्त होता. तपासण्यानंतर काही वेळ आराम घेतल्यानंतर ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने केवळ त्याला फलंदाजी करण्याची परवानगी दिलेली आहे. मार्श सध्या गोलंदाजी करण्यासाठी फिट नाही. तसेच भारताविरुद्ध बॉर्डर गावस्कर 2025 ट्रॉफी दरम्यान सुद्धा मार्शला दुखापतीच्या अवस्थेत पाहण्यात आलं होतं. त्यामुळे सध्या आयपीएल 2025 च्या पूर्ण हंगामात तो गोलंदाज म्हणून खेळताना दिसणार नाही.

आयपीएल 2025 हंगाम सुरू होण्याआधी मिचेल मार्श चांगल्या फॉर्ममध्ये नव्हता. पण लखनऊ सुपर जायंट्स संघाविरुद्ध त्यांनी 36 चेंडूत 72 धावांची महत्त्वपूर्ण पारी खेळली, पण ती वेगळी गोष्ट आहे की लखनऊ संघ जिंकू शकला नाही. तसेच त्याच्या 72 धावांच्या पारीमुळे लखनऊने 290 धावांचं आव्हान दिल्लीसमोर ठेवलं होतं.

तसेच दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स हा सामना गमावणारच होते, पण आशुतोष शर्मा आणि विपराज निगम यांनी दिल्लीला विजय मिळवून दिला. विपराज निगमने 15 चेंडूत 39 धावा तर आशुतोष शर्मा 31 चेंडूत 66 धावांची आक्रमक खेळी केल्यामुळे दिल्लीला विजय मिळवणे सोपे झाले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---