---Advertisement---

मिचेल मार्शचा महारेकॉर्ड! टी20 क्रिकेट इतिहासात ‘ही’ कामगिरी करणारा पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज

On: रविवार, ऑगस्ट 10, 2025 5:11 PM
---Advertisement---

डार्विनच्या मारारा क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका (AUS vs SA) दोन्ही संघात खेळल्या जाणाऱ्या पहिल्या टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने दमदार फलंदाजीची झलक दाखवली. दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला हा निर्णय योग्य वाटला, पण त्यानंतर कॅमरून ग्रीनची (Camron green) शानदार खेळी आणि टिम डेविडच्या (Tim David Half Century vs SA) तुफानी अर्धशतकामुळे ऑस्ट्रेलियाच्या डावाला मजबुती मिळाली.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाची कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या मिचेल मार्शने (Mitchell Marsh) एक खास विक्रम आपल्या नावावर केला. सलामी फलंदाज म्हणून खेळताना, लुंगी एनगिडीच्या सामन्यातील पहिल्याच चेंडूवर त्याने षटकार ठोकत खाते उघडले. असं करताना मार्श (Mitchell Marsh Six on the first ball in a T20I for Australia) ऑस्ट्रेलियाकडून टी 20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिल्याच चेंडूवर षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला. याआधी माजी कर्णधार आरोन फिंचनंही पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला होता, पण तो पराक्रम त्याने धावांचा पाठलाग करताना केला होता.

मार्शच्या या आक्रमक सुरुवातीने केवळ प्रेक्षकांचं मनोरंजनच झालं नाही, तर संघाला जलद गतीने धावा करण्याचा आत्मविश्वासही मिळाला. जरी त्याची खेळी केवळ 13 धावांचीच होती, तरीही ती संघाच्या विचारसरणीचं दर्शन घडवण्यासाठी पुरेशी होती. तीन सामन्यांच्या या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ विजयासह मालिकेला सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---