---Advertisement---

सावध व्हा! ‘हा’ ऑस्ट्रेलियन खेळाडू गाजवणार टी-२० विश्वचषक स्पर्धा, कामगिरी पाहून फुटेल घाम

On: रविवार, ऑगस्ट 8, 2021 3:09 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील सुरुवातीच्या तीन सामन्यात पराभूत झाल्यानंतर चौथ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने पुनरागमन करत विजय मिळवला आहे. ऑस्ट्रेलिया संघाला गेल्या काही महिन्यांपासून साजेशी कामगिरी करण्यात अपयश येत असले, तरी देखील या संघात असा एक खेळाडू आहे, जो आपल्या वेगवान गोलंदाजी आणि तुफान फटकेबाजीने विरोधी संघाचा घाम काढू शकतो.

येत्या काही महिन्यात युएई आणि ओमानमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघाला देखील विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघ या स्पर्धेसाठी कसून सराव करताना दिसून येत आहे. या संघातील अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श सध्या जोरदार फॉर्ममध्ये आहे. तो आपल्या अष्टपैलू कामगिरीने सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

मिचेल मार्शने २०२१ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याला ३६० धावा करण्यात यश आले आहे. या दरम्यान त्याने ४ अर्धशतक झळकावले आहेत. वेस्ट इंडिज संघाविरुद्ध झालेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत त्याने ५१, ५४, ९, ७५ आणि ३० धावांची खेळी केली होती. (Mitchell Marsh performance in last 8 T20I will he make it to austrelias T20 world cup squad)

तसेच बांगलादेश संघाविरुद्ध सुरू असलेल्या ५ टी -२० सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यात त्याने ४५, ४५ आणि ५१ धावांची खेळी केली. त्यामुळे आगामी टी-२० विश्वचषकात तो ऑस्ट्रेलियन संघाकडून खेळताना दिसून येईल यात काही शंका नाही.

ऑस्ट्रेलिया संघाने ३ गडी राखून मिळवला विजय
या सामन्यात बांगलादेश संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १०४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून ऍश्टन एगर आणि डॅनियल क्रिश्चियनने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला ३ गडी राखून विजय मिळवून दिला.

महत्त्वाच्या बातम्या-

-बिचारा कोहली! नॉटिंघम कसोटीत इंग्लंडच्या प्रेक्षकांचा उर्मटपणा, ‘या’ गोष्टीवरून उडवली भरपूर खिल्ली

-रिषभच्या छोटेखानी खेळीचा ‘हा’ पाकिस्तानी दिग्गजची बनला चाहता, केलं तोंडभरुन कौतुक

-IND vs ENG: रोहितचा कसोटी संघातून कटणार पत्ता? ‘हा’ युवा खेळाडू राहुलसह करणार ओपनिंग

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---