---Advertisement---

सॅंटनरने हैद्राबादमध्ये घातला धूमाकूळ! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला किवी फिरकीपटू

On: सोमवार, ऑक्टोबर 9, 2023 10:34 PM
---Advertisement---

न्यूझीलंड आणि नेदरलॅंड्स यांच्यात सोमवारी (9 ऑक्टोबर) विश्वचषकाचा सहावा सामना खेळला गेला. न्यूझीलंडने हा सामना 99 धावांच्या मोठ्या अंतराने नावावर केला. नेदरलँड्सला विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांना गाठता आले नाही. न्यूझीलंडसाठी अष्टपैलू  मिचेल सँटनर याने सर्वोत्तम प्रदर्शन केले. त्याने पाच बळी मिळवत न्यूझीलंडसाठी विश्वचषकात एक मोठा विक्रम केला.

या सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा आपली क्षमता दाखवून दिली. विल यंग, रचिन रविंद्र व कर्णधार टॉम लॅथम यांनी संघासाठी अर्धशतके झळकावली. तसेच डेरिल मिचेल व सॅंटनर यांनी उपयुक्त खेळ्या करत न्यूझीलंडला 322 पर्यंत मजल मारून दिली. नेदरलँड्स संघासाठी आर्यन दत्त याने दोन बळी मिळवले.

या धावांचा बचाव करण्यासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघासाठी सर्वच गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी केली. मात्र, फिरकीपटू मिचेल सॅंटनर याने सर्वोत्कृष्ट कामगिरी करून दाखवली. त्याने 59 धावा देताना पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. वनडे विश्वचषकात न्यूझीलंडसाठी पाच बळी घेणारा तो पहिला फिरकीपटू ठरला. याच कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.

न्यूझीलंड संघासाठी त्याने पहिल्या सामन्यात देखील उत्कृष्ट गोलंदाजी करताना इंग्लंडविरुद्ध केवळ 37 धावांत दोन फलंदाजांना बाद केलेले. विशेष म्हणजे त्याने यावेळी एकही चौकार व षटकार दिला नव्हता. सध्या तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.

(Mitchell Santner Becomes first ever Kiwi spinner to take a fifer in the World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
फिट & फाईन बोल्ट! सीमारेषेजवळ टिपला अविश्वसनीय झेल, तुम्हीही पाहा व्हिडिओ
रचिन रविंद्रच्या बॅटला फुटले पंख, आयसीसीनेही घेतली दखल, व्हिडिओ व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---