न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रिवंद्र सध्या विश्वचषकात अप्रतिम प्रदर्शन करत आहे. सोमवारी (9 ऑक्टोबर) नेदर्लंड्सविरुद्ध रचिनने अर्धशतक केले, तर विश्वचषक 2023च्या पहिल्याच सामन्यात इंग्लंडविरुद्ध शतकी खेळी केली होती. आगामी सामन्यांमध्येही रचिनकडून अशाच प्रदर्शनाची अपेक्षा आहे. पण सोशल मीडियावर रचिनच्या बॅटला पंख फुटल्याचे बोलले जात आहे. कारण आहे, सोमवारच्या सामन्यात घडलेला एक प्रकार.
आयसीसी वनडे विश्वचषक (ODI World Cup 2023) सध्या भारतात खेळला जात आहे. विश्वचषकातील सहावा सामना न्यूझीलंड आणि नेदर्लंड्स यांच्यात हैदराबादमध्ये सोमवारी आयोजित केला गेला होता. या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 322 धावा कुटल्या. सचिन रविंद्र यानेही 51 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. न्यूझीलंडच्या डावातील 19व्या षटकात खेळपट्टीवर रचिन रविंद्र (Rachin Ravindra) याची बॅट खेळपट्टीवर अडकली आणि नंतर हवेत देखील उडाली. रचिन नॉन स्ट्राईक एंडला क्रीजमध्ये वेळेत पोहोचण्यासाठी बॅट मैदानात टेकवून धावत होता. पण ऐन वेळी बॅठ मैदानात अडकली. यावेळी नेदर्लंड्सच्या खेळाडूने मारलेला थ्रो सुदैवाने स्टप्सवर लागला नाही आणि रचिनची विकेट देखील वाचली.
https://www.instagram.com/reel/CyLKQKcvIQx/?utm_source=ig_web_copy_link
(NED vs NZ That Rachin Ravindra bat has got wings Video goes Viral )
विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट
नेदरलँड – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
महत्वाच्या बातम्या –
VIDEO । नेदर्लंड्सचा गोलंदाज थोडक्यात वाचला, चेंडू न मारल्यामुळे मानले फलंदाजाचे आभार
रोहितने 22 महिन्यांपूर्वी व्यक्त केलेला विश्वास विराट-राहुलने ठरवला सार्थ, वाचा काय म्हणालेला कॅप्टन