---Advertisement---

VIDEO । नेदर्लंड्सचा गोलंदाज थोडक्यात वाचला, चेंडू न मारल्यामुळे मानले फलंदाजाचे आभार

On: सोमवार, ऑक्टोबर 9, 2023 7:24 PM
Thank you for not hitting Paul van Meekeren
---Advertisement---

वनडे विश्वचषक 2023मधील सहावा सामना न्यूझीलंड आणि नेदर्लंड्स यांच्यात खेळला गेला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी धमाकेदार प्रदर्शन केले. प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेण्याऱ्या नेदर्लंड्सला विजयासाठी 323 धावांचे लक्ष्य मिळाले. न्यूझीलंडच्या डावादरम्यान, गोलंदाज पॉल वॅन मीकरेन यांनी दुखापत होण्यापासून थोडक्यात बचावला.

न्यूझीलंडच्या डावातील 39व्या षटकात डारिल मिचेल स्ट्राईकवर होता. षटकातील दुसरा चेंडू वॅन मीकरेन याने ओव्हर द विकेट टाकला, जो स्टंप्सपासून काही इंच बाहेर होता. मिचेलने हा चेंडू जोरात मारला, जो थेट नॉन स्ट्राईक एंडवरील स्टंप्सच्या दिशेने आला. सुदैवाने त्यावेळी गोलंदाज मीकरेन खेळपट्टीच्या एका बाजूला होता. तसेच पंचांना देखील हा चेंडू लागला नाही. मिचेलने चेंडू एवढा जोरात मारला होता की नॉन स्ट्राईकवरील स्टंप्स हवेत उडून लांब पडला. हा शॉक आलल्याला लागला नाही, यासाठी गोलंदाजाने देखील एकप्रकारे डॅरिल मिचेलचे आभार मानले. व्हायरल व्हिडिओच्या शेवटची मीकरेन मिचेकडे पाहून हात जोडताना दिसत आहे.

https://www.instagram.com/reel/CyLUUL4PyAK/?utm_source=ig_web_copy_link

(“Thank you for not hitting me,” Paul van Meekeren)

विश्वचषक 2023 स्पर्धेतील सातव्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
न्यूझीलंड – डेवॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक/कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिशेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

नेदरलँड – विक्रमजीत सिंग, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, बास डी लीड, तेजा निदामनुरु, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), सीब्रँड एंजेलब्रेच, रोएलॉफ व्हॅन डर मर्वे, रायन क्लेन, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन

महत्वाच्या बातम्या – 
सलग दुसऱ्या विश्वचषक सामन्यात न्यूझीलंडच्या फलंदाजांचा धमाका! नेदर्लंड्सविरुद्ध रचला धावांचा मोठा डोंगर
सामन्यानंतर ड्रेसिंग रूममध्ये विराटचा Gold Medal ने सन्मान, पण का दिले पदक? पाहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---