नॉटिंगहॅम। गुरुवारी(6 जून) 2019 विश्वचषकातील 10 वा सामना विंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात ट्रेंट ब्रिज मैदानावर पार पडला. अटीतटीच्या झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने 15 धावांनी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयात वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कने 5 विकेट्स घेत मोलाचा वाटा उचलला.
याबरोबरच स्टार्कने वनडे क्रिकेटमध्ये 150 विकेट्सचा टप्पा पार करत एक खास विश्वविक्रमही केला आहे. स्टार्कने हा 150 वनडे विकेट्सचा टप्पा 77 सामन्यात पूर्ण केला आहे. त्यामुळे तो वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 150 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला आहे.
हा विश्वविक्रम करताना त्याने पाकिस्तानचे माजी दिग्गज ऑफ स्पिनर सक्लेन मुश्ताक यांचा विश्वविक्रम मोडला आहे. मुश्ताक यांनी 78 वनडे सामन्यात 150 विकेट्सचा टप्पा 16 जानेवारी 1998 ला भारताविरुद्ध खेळताना पार केला होता.
स्टार्कचे वनडेमध्ये आता 77 सामन्यात 21.09 च्या सरासरीने 151 विकेट्स झाल्या आहेत.
गुरुवारी झालेल्या सामन्यात स्टार्कने ख्रिस गेल, आंद्रे रसल, कार्लोस ब्रेथवेट, जेसन होल्डर आणि शेल्डन कॉट्रेल यांना बाद करत 5 विकेट्स घेण्याची कमाल केली. त्यामुळे तो विश्वचषकात दोन सामन्यात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी करणारा जगातील 6 वा गोलंदाजही ठरला आहे.
विश्वचषकात दोन वेळा 5 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स याआधी गॅरि गिलमोर, अशंता द मेल, ग्लेन मॅग्राथ, वेसबर्ट ड्राके आणि शाहिद आफ्रिदी यांनी केला आहे.
त्याचबरोबर स्टार्कने विश्वचषकात 25 विकेट्स घेण्याचाही टप्पा पार केला आहे. हा टप्पा त्याने केवळ 10 सामन्यात खेळताना पार केला असल्याने विश्वचषकात सर्वात जलद 25 विकेट्स घेणारा गोलंदाजही तो ठरला आहे.
त्याने ट्रेंट बोल्ट, टिम साऊथी आणि इम्रान ताहिर यांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. या तिघांनीही विश्वचषकात 11 सामन्यात 25 विकेट्सचा टप्पा पार केला होता. स्टार्कचे आता विश्वचषकात 10 सामन्यात 28 विकेट्स झाल्या आहेत.
वनडेमध्ये सर्वात जलद 150 विकेट्स घेणारे गोलंदाज –
77 सामने – मिशेल स्टार्क
78 सामने – सक्लेन मुश्ताक
81 सामने – ट्रेंट बोल्ट
82 सामने – ब्रेट ली
84 सामने – अजंता मेंडीस
89 सामने – ऍलेन डोनाल्ड / इम्रान ताहिर / मॉर्ने मॉर्केल
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–एमएस धोनीला ही गोष्ट पुन्हा करता येणार नाही, आयसीसीची बीसीसीआयला ताकिद
–विश्वचषक २०१९: शेल्डन कॉट्रेलने बाउंड्री लाईनवर स्टिव्ह स्मिथ घेतला शानदार झेल, पहा व्हिडिओ
–…म्हणून विकेट घेतल्यानंतर सलामी देत सेलिब्रेशन करतो शेल्डन कॉट्रेल