---Advertisement---

बडे मिया.. छोटे मिया सुभानल्ला! मिचेल स्टार्कच्या भावाने कॉमनवेल्थमध्ये जिंकले सिल्वर मेडल

Mitchell Starc, Brandon Starc
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याच्या धारदार गोलंदाजीशी सर्वजण परिचित आहेत. स्टार्क त्याच्या भेदक यॉर्करने जगभरातील मातब्बर फलंदाजांनाही गुडघे टेकायला भाग पाडतो. तो २०१५ सालच्या वनडे विश्वविजेत्या आणि २०२१ सालच्या टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग राहिला आहे. त्याची पत्नी एलिसा हिली हीदेखील कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये उपांत्य सामन्यात पोहोचलेल्या ऑस्ट्रेलिया संघाचा भाग आहे. तसेच स्टार्क कुटुंबातील आणखी एक सदस्य कॉमनवेल्थ गेम्समध्ये आपल्या नावाचा डंका पिटत आहे. तो आहे, स्टार्कचा छोटा भाऊ ब्रेंडन स्टार्क.

२८ वर्षीय ब्रेंडन स्टार्कने (Brendon Starc) बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (Commonwealth Games 2022) मध्ये पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत रौप्य पदक आपल्या नावावर केले आहे. उंच काठीच्या ब्रेंडन स्टार्कने २.२५ मीटर उंच उडी मारत रौप्य पदकाला गवसणी घातली आहे. तर भारताच्या तेजस्विन शंकरने २.२२ मीटर उंच उडी मारत कांस्य पदक पटकावले आहे.

ब्रेंडन स्टार्कच्या करामती
ब्रेंडन स्टार्कने कॉमनवेल्थ गेम्समध्ये जिंकलेले हे पहिले पदक नाही. यापूर्वीही बऱ्याचशा स्पर्धांमध्ये त्याने पदके आपल्या नावावर केली आहेत. ब्रेंडन स्टार्कने २०१८ मध्ये गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले होते. ब्रेंडन स्टार्कने २०१० मध्ये त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्याने २०१० मध्ये यूथ ऑलिंपिकमध्ये २.१९ मीटर उंच उडी मारत रौप्य पदक जिंकले होते. त्यानंतर २०१४ ग्लास्गो कॉमनवेल्थ गेम्समध्ये त्याला खास कमाल करता आली नव्हती.

टोकियो ऑलिंपिक २०२० मध्येही तो सहभागी झाला होता. टोकियो ऑलिंपिकच्या अंतिम सामन्यात मात्र त्याला विशेष कामगिरी करता आली नव्हती. तो १५ व्या क्रमांकावर राहिला होता.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

कसलं भारी ना! दिनेश कार्तिकच्या पत्नीशी कांस्य पदक विजेत्या सौरव घोषालचे आहे जवळचे नाते

मोहम्मद शमीच्या टी२० कारकिर्दीवर नेहमीसाठी ब्रेक? निवडकर्त्यांनी कारण सांगून बसवलंय बाहेर

गोष्ट एका क्रिकेटरची भाग १९: पाकिस्तानला नेहमीच घाम फोडणारा वेंकटेश प्रसाद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---