---Advertisement---

“या गोष्टींकडे फारसे…”, यशस्वी जयस्वालने केलेल्या स्लेजिंग वर मिचेल स्टार्कची प्रतिक्रिया समोर

---Advertisement---

बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024 मधील भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिली कसोटी पर्थ येथे खेळली गेली. ज्यामध्ये टीम इंडियाने 295 धावांनी मोठा विजय नोंदवला. या सामन्यात यशस्वी जयस्वाल आणि मिचेल स्टार्क यांच्यात एक मजेदार घटना घडली. ज्यात जयस्वाल असे म्हणत होता की, स्टार्क खूप हळू गोलंदाजी करत आहे. आता सर्वांच्या नजरा ॲडलेडमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याकडे लागल्या आहेत. जी गुलाबी चेंडूने खेळवली जाणार आहे. पण त्याआधी मिचेल स्टार्कचे एक वक्तव्य व्हायरल झाले आहे.

मिचेल स्टार्क म्हणला की, आजकाल तो मैदानावर कोण कसे गोलंदाजी करतो याकडे फारसे लक्ष देत नाही. पर्थ कसोटीत जयस्वालने ज्या चेंडूवर स्टार्कला स्लेज करण्याचा प्रयत्न केला. तो चेंडू स्टार्कने ताशी 141 किमी वेगाने चेंडू टाकला होता. असे असतानाही भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालने त्याला ‘स्लो बॉल’ असे संबोधले होते.

मिचेल स्टार्क म्हणाला, “खरं तर जयस्वालने मी संथ गतीने गोलंदाजी करत असल्याचे बोलला नाही. मी तसं काही ऐकलो पण नाही. तसेच आजकाल मी या गोष्टींकडे फारसे लक्ष देत नाही. मी आधी लक्ष द्यायचे, पण आता मी त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याने एका चेंडूवर फ्लिक शॉट खेळला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर त्याने बचाव केला. तेव्हा मी विचारले की फ्लिक शॉट कुठे आहे. ज्यावर तो हसला.”

या जीवघेण्या ऑस्ट्रेलियन गोलंदाजाने यशस्वी जयस्वालला आदर दाखवत पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी केल्याचे सांगितले. जयस्वाल भारतीय क्रिकेटला दीर्घकाळ पुढे नेण्याचे काम करू शकतो. असा विश्वास स्टार्कला वाटतो. जयस्वाल पहिल्या डावात शून्य धावांवर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या डावात त्याने 161 धावांची शानदार खेळी खेळली आणि भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

हेही वाचा-

पाकिस्तानची पुन्हा नाचक्की! झिम्बाब्वेविरुद्ध लाजिरवाणा पराभव
4 षटकार अन् 9 चौकार, अजिंक्य रहाणेचं रौद्र रुप पाहून गोलंदाजांना काहीच सुचेना!
आयपीएल फ्रॅन्चाईजींंची ब्रॅन्ड व्हॅल्यू जाहीर; मुंबई इंडियन्स दुसऱ्या स्थानी, पहिल्या क्रमांकावर कोणती टीम?

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---