---Advertisement---

दुसऱ्या डावात ‘या’ फलंदाजाला लवकर बाद करावे लागणार, मिचेल स्टार्कने स्पष्टच सांगितलं

---Advertisement---

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघातील 5 सामन्यांच्या बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी (Border Gavaskar Trophy) स्पर्धेतील दुसरा कसोटी सामना ॲडलेडच्या मैदानावर रंगला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा करणारा भारतीय संघ 180 धावात गारद झाला. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) 6 विकेट्स घेत भारतीय फलंदाजीची कंबर मोडली. दरम्यान आता त्याने मोठे वक्तव्य केले आहे.

पहिल्या पर्थ कसोटीत शतक झळकावणाऱ्या यशस्वी जयस्वालला (Yashasvi Jaiswal) सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद करून स्टार्कने ऑस्ट्रेलियाला दमदार सुरूवात करून दिली होती. दरम्यान स्टार्क म्हणाला, “गेल्या आठवड्यात पहिल्या कसोटी सामन्यात जयस्वालने चमकदार कामगिरी केली होती, त्यामुळे त्याला लवकर बाद करणे चांगले होते. दुसऱ्या डावातही त्याला लवकर बाद करण्यासाठी आम्हाला काम करावे लागेल.”

स्टार्कने असेही सांगितले की, फ्लडलाइट्सखाली खेळलेले तिसरे सत्र आमच्या फलंदाजांसाठी सर्वात आव्हानात्मक होते. स्टार्क नॅथन मॅकस्वीनी, मार्नस लॅबुशेनचे कौतुक करत म्हणाला, “नक्कीच सर्वात कठीण वेळ म्हणजे अगदी नवीन गुलाबी चेंडूसह तिसरे सत्र, पहिल्या दिवसाचा खेळ पूर्ण करणे, विशेषत: मार्नस आणि मॅकस्वीनी यांनी खराब प्रदर्शनाचा सामना करणे आणि स्पष्टपणे खूप चांगल्या गोलंदाजी आक्रमणाचा दबाव सहन करणे.”

पुढे बोलताना मिचेल स्टार्क म्हणाला, “गेल्या आठवड्यापूर्वीही आम्ही जयस्वालचा थोडासा खेळ पाहिला होता आणि त्यानंतर दुसऱ्या डावात (पर्थमध्ये) ही त्याची कामगिरी उत्कृष्ट होती. कुमारने (नितीश रेड्डी) खेळलेल्या शॉट्समध्ये काही खास शॉट्स होते. टी20 क्रिकेट असो किंवा कसोटी क्रिकेटमध्ये येणे असो, पुढची पिढी बिनधास्त क्रिकेट खेळते. मी खूप दिवसांपासून ते थोडे बदलताना पाहत आलो आहे. कमी भीती असो किंवा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्या फलंदाजांनी सुरूवात केल्यावर त्यांना थोडा अधिक आत्मविश्वास ठेवण्यास सांगावे लागेल, परंतु मला खात्री आहे की ते पाहणे रोमांचक असेल.”

महत्त्वाच्या बातम्या-

IPL मेगा लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातील पहिलाच
झॅक क्राॅलीने रचला इतिहास! 147 वर्षाच्या कसोटी इतिहासात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
SA VS SL; अँजेलो मॅथ्यूजचा मोठा विक्रम, श्रीलंकेसाठी अशी कामगिरी करणारा केवळ तिसरा फलंदाज

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---