इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात खेळली जाणार ऐतिहासिक ऍशेस मालिका अवघ्या काही दिवसांवर आली आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने आगामी ऍशेस मालिकेपूर्वी खास प्रतिक्रिया दिली आहे. स्टार्कच्या मते ऑस्ट्रेलियन संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवण्यासाठी तो आपल्या गोलंदाजीच्या शैलीत जराही बदल करणार नाहीये.
मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याच्या मते त्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान बवण्यासाठी आपली गोलंदाजीची शैली बदलली, तर ऑस्ट्रेलियन संघाचे गोलंदाजी आक्रमण एकसारखे होईल. या गोष्टीची संघाला काहीच फायदा होणार नाही. दरम्यान, 2019 च्या ऍशेस मालिकेत स्टार्कला तीन सामन्यांमध्ये बेंचवर बसण्याची वेळ आली होती. तेव्हाचे ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी यामागचे कारण देखील स्पष्ट केले होते. लँगर यांच्या मते जोस हेजलवूड (Josh Hazlewood) विरोधी संघाच्या धावांवर नियंत्रण ठेवू शकतो, त्यामुळे त्याला स्टार्कच्या आधी संघात निवडले गेले होते. याच पार्श्वभूमीवर आगामी ऍशेसच्या आधी स्टार्कला प्रश्न विचारला गेला. यावर स्टार्कने आपली मत स्पष्टपणे व्यक्त केले.
माध्यमांतील वृत्तांनुसार मिचेल स्टार्कने आपले गोलंदाजी प्रदर्शन आणि प्लेइंग इलेव्हनमधील त्याचे स्थान याविषयी महत्वाची माहिती दिली आहे. मिचेल स्टार्क म्हणाला, “मी एक गोष्ट शिकलो आहे की, संघात फिट होण्यासाठी आपल्या गोलंदाजी बदल करायचा नाही. मैदानातील परिस्थितीमुळे जर मी संघात नसेल, तर मला काहीच अडचण नाहीये. मी स्लीप्सवर जास्त जोर देतो, जेणेकरून आपले गोलंदाजी आक्रमण अजून मजबूत होईल. मी स्कॉट बोलंड, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूडसारखी गोलंदाजी नाही करू शकत. प्लेइंग इलेव्हनमध्ये येण्यासाठी मी आपली गोलंदाजी बदलू शकत नाही.”
दरम्यान, यावर्षीची आशिस मालिका इंग्लंडमध्ये होणार आहे. 16 जून रोजी ऍशेसचा पहिला सामना एजबस्टनमध्ये खेळला जाईल. तसेच मालिकेतील शेवटचा सामना 27 जुलै रोजी खेळला जाईल. मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियन संघाकडून ऍशेसमध्ये इंग्लंडला 4-0 असा पराभव स्वीकारावा लागला. मालिकेती चार सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले अशून एक सामना अनिर्णीत राहिला होता. (Mitchell Starc will not make any changes in his bowling to fit in the playing eleven for Ashes 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Video : अबू धाबीतील खास सोहळ्यासाठी पृथ्वी शॉने गर्लफ्रेंडसोबत लावली हजेरी, सर्वत्र रंगलीय चर्चा
आयपीएल हंगामातून बाहेर पडल्यानंतर मुंबईला आठवला जसप्रीत बुमराह; आर्चरचं नाव घेत प्रशिक्षक म्हणाले…