---Advertisement---

स्टार्क नाही खेळणार बीबीएलचा अंतिम सामना, कारण ऐकून कराल कौतुक

---Advertisement---

ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या बिग बॅश लीगचा (बीबीएल) अंतिम टप्पा जवळ आला आहे. गतविजेत्या सिडनी सिक्सर्सने चालू हंगामात देखील अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी केली. मात्र, सिक्सर्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क या सामन्यात खेळणार नाही. संपूर्ण हंगामात उत्तम कामगिरी केलेल्या खेळाडूंना संधी मिळावी, म्हणून आपण हा अंतिम सामना खेळणार नसल्याचे त्याने जाहीर केले. बीबीएलचा अंतिम सामना ६ फेब्रुवारी रोजी सिडनी येथे पार पडेल.

सिडनी संघाचा भाग आहे स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेला स्टार्क २०१४ सालापासून बीबीएलमध्ये सहभागी झाला नाही. व्यस्त आंतरराष्ट्रीय वेळापत्रक व दुखापतीमुळे त्याला स्पर्धेत खेळता येत नव्हते. मात्र, यावर्षी त्याने पुन्हा एकदा सिडनी सिक्सर्स संघाशी करार केला होता. सिडनी संघ अंतिम फेरीत पोहोचल्यास स्टार्क उपलब्ध असेल असे सांगण्यात आले होते. परंतु, स्टार्कने मनाचा मोठेपणा दाखवत आपण हा अंतिम सामना खेळणार नसल्याचे म्हटले.

हकदार खेळाडूंना मिळावी संधी

मिचेल स्टार्कने एका आघाडीच्या क्रीडा संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले, “सर्व खेळाडूंनी या वर्षी भरपूर मेहनत घेतली आहे. माझ्या मते ही सकारात्मक बाब असेल की त्याच खेळाडूंना अंतिम सामन्यातही संधी मिळावी. एक संघ सहकारी म्हणून मी त्यादिवशी प्रेक्षकात हजर राहून त्यांना पाठिंबा देईल.” स्टार्कच्या या मोठ्या निर्णयानंतर अनेकांनी त्याचे कौतुक केले.

सिडनी सिक्सर्स व्यवस्थापनाने केली पुष्टी

मिचेल स्टार्क अंतिम सामन्यात सहभागी होणार नसल्याची पुष्टी सिडनी सिक्सर्स संघ व्यवस्थापनाने ट्विटरद्वारे केली. संघाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आले की, “सिडनी सिक्सर्स व मिचेल स्टार्क यांच्यातील सहसंमतीने ठरवण्यात आले आहे की, स्टार्क शनिवारी होणाऱ्या बिग बॅश लीगच्या अंतिम सामन्यात संघाचा भाग नसेल.”

या ट्वीटपाठोपाठ सिडनी सिक्सर्सचे संचालक जॉर्डी  हॉकिन्स यांनी म्हटले की, स्टार्क व नॅथन लायन हे संघाचे दोन्ही वरिष्ठ खेळाडू प्रेक्षकांमध्ये उपस्थित राहून संघाचा उत्साह वाढवतील. बीबीएलचा अंतिम सामना शनिवारी (६ फेब्रुवारी) सिडनीतील सिडनी क्रिकेट ग्राउंडवर पार पडेल. पर्थ स्कॉर्चर्स व ब्रिस्बेन हिट यांच्यातील विजेता संघ अजिंक्यपदासाठी सिडनी सिक्सर्सशी दोन हात करेल.

महत्वाच्या बातम्या:

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकल्यानंतर एम अश्विनने काढली स्वर्गीय आईची आठवण, लिहली भावनिक पोस्ट

ब्रेकिंग! क्रिकेट ऑस्ट्रेलियाने या कारणामुळे दक्षिण आफ्रिका दौरा केला स्थगित

गल्ली ते दिल्ली मराठमोळ्या रहाणेची चर्चा, संसदेत केले गेले कौतुक

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---