भारताची महिला वनडे संघाची कर्णदार मिताली राजने आत्तापर्यंत तिच्या कारकिर्दीत अनेक मोठी यशाची शिखरे गाठली आहेत. यातच आणखी एका मोठ्या विक्रमाची शुक्रवारी भर पडली आहे. मितालीने शुक्रवारी(१२ मार्च) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लखनऊ येथे वनडे सामन्यात खेळताना आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत १० हजार धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा पार करणारी ती भारताची पहिलीच भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्या या यशाबद्दल भारतीय महिला संघाने जोरदार सेलिब्रेशन केले आहे.
मिताली राजचा विक्रम –
शुक्रवारी भारतीय महिला संघ दक्षिण आफ्रिका महिला संघाविरुद्ध वनडे मालिकेतील तिसरा सामना खेळला. हा सामना भारतीय संघाला गमवावा लागला. पण असे असले तरी या सामन्यात ३६ धावांची खेळी करणाऱ्या मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण केल्या.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा आकडा गाठणारी मिताली जगातील दुसरी आणि भारतातील पहिलीच महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिच्यापूर्वी महिला क्रिकेटमध्ये असा विक्रम केवळ इंग्लंडची फलंदाज शार्लेट एडवर्ड्सला करता आला आहे. तिने १०२७३ धावा केल्या आहेत.
मितालीच्या यशाचे सेलिब्रेशन
मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा पार केल्याबद्दल सामना संपल्यानंतर भारतीय महिला संघाने जोरदार सेलिब्रेशन केले. सामन्यानंतर मितालीने खास केक कापून सेलिब्रेशन केले. यावेळी भारतीय महिला संघातील खेळाडू तसेच सपोर्ट स्टाफमधील सदस्य उपस्थित होते. त्यांनी मितालीला केक भरवून तिचे तोंड गोड केले. या सेलिब्रेशनचे फोटो बीसीसीआय तसेच आयसीसीने शेअर केले आहेत. हे फोटो सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
बीसीसीआयने फोटो शेअर करताना लिहिले की ‘भारतीय संघाने वनडे कर्णधार मिताली राजसाठी केक कापला. मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनली आहे.’
#TeamIndia cut a cake for ODI captain @M_Raj03, who became the first Indian woman batter to score 1⃣0⃣,0⃣0⃣0⃣ runs in international cricket. 👏👏@Paytm #INDWvSAW pic.twitter.com/JjSpwBsFJW
— BCCI Women (@BCCIWomen) March 12, 2021
तसेच आयसीसीने म्हटले आहे की ‘यशामबद्दल खास सेलिब्रेशन. मिताली राज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा करणारी पहिला भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली.’
A special celebration for a special achievement 🎂@M_Raj03 – the first woman from India to cross 10,000 international runs 👏 pic.twitter.com/WYDE032OzD
— ICC (@ICC) March 13, 2021
दिग्गजांनी केले मितालीचे कौतुक
मितालीच्या यशाबद्दल सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण अशा दिग्गजांनीही मितालीचे कौतुक केले आहे. सचिनने ट्विट केले की ‘आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा केल्याबद्दल मिताली राजने अभिनंदन. काय मस्त कामगिरी केली आहे. अशीच पुढे खेळत राहा.’
Heartiest congratulations Mithali on completing 1️⃣0️⃣,0️⃣0️⃣0️⃣ runs in International Cricket.
Terrific achievement… 👏🏻
Keep going strong! 💪🏻 pic.twitter.com/1D2ybiVaUt— Sachin Tendulkar (@sachin_rt) March 12, 2021
तसेच लक्ष्मणने ट्विट केले आहे की ‘१० हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू बनल्याबद्दल अभिनंदन मिताली राज. तू फक्त या खेळाची अँबेसिडरच नाही तर दिग्गज आहेस. तू क्रिकेटच्या पिढीला प्रेरणा दिली आहे. तूझा अभिमान वाटतो.’
Congratulations @M_Raj03 on becoming the first Indian Woman Cricketer to score 10K runs! You are not only a great ambassador and a legend of the game but you have inspired a generation of cricketers to take up our sport. Proud of you👍🤗 #INDWvSAW @BCCI pic.twitter.com/WHwe9qws15
— VVS Laxman (@VVSLaxman281) March 12, 2021
मितालीची कारकिर्द –
आजवर वनडे क्रिकेटमध्ये मितालीने २१२ सामने खेळताना ५०.६४ च्या सरासरीने ६९७४ धावा केल्या आहेत. तर ८९ टी२० सामन्यात २३६४ धावा आणि १० कसोटी सामन्यात ६६३ धावा नोंदवल्या आहेत. अशाप्रकारे तिन्ही स्वरुपात मिळून तिने एकूण १०००१ धावा कुटल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
लॉकडाऊनमध्ये ‘या’ गोष्टी केल्याने सुर्यकुमार राहिला फिट; तीन महिन्यात केले १२ किलो वजन कमी
भुतकाळात डोकावताना: ईडन गार्डन जळत होत आणि कांबळीसोबत सारा भारत रडत होता…
हार्दिकने खाली पडतानाही मारला ‘अनोखा’ शॉट अन् चेंडू सीमारेषेपार; आयसीसीही झाली दंग