महिला क्रिकेट संघ आणि पुरुष संघात होत असलेला फरक मलेशियात सुरू असलेल्या अशिया महिला चषक स्पर्धेतून पुन्हा एकदा समोेर आला आहे.
भारतीय महिला संघाने या स्पर्धेत मलेशिया आणि थायलंड विरुद्ध विजय मिळवला. या दोन सामन्यासाठी अनुक्रमे मिताली राज आणि हरमनप्रीत कौरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
पण या पुरस्काराची रक्कम फक्त 250 यूएस डॉलर्स म्हणजेच साधारणपणे 16, 778 रुपये देण्यात आली. त्यामुळे पुन्हा एकदा महिला आणि पुरुष संघात केला जाणारा फरक प्रकर्षाने सर्वांना दिसून आला.
तर भारतीय पुरुष संघातील खेळाडूंना सामनावीर पुरस्कारावेळी कमीतकमी १ लाख रुपये मिळतात.
टेनिसमध्ये काही वर्षांपुर्वीच पुरुष आणि महिला खेळाडूंना समान वेतन, बक्षिस देण्यास सुरुवात झाली आहे मात्र क्रिकेटमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंच्या वेतनात खुपच तफावत आहे.
बीसीसीआयच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून मिताली राज आणि हरमनप्रीत कौरला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आल्यानंतरचे फोटो शेअर करण्यात आले. परंतू त्यांना या पुरस्करासाठी मिळालेली रक्कम पाहुन चाहत्यांनी त्यावर तिखट प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत.
https://www.instagram.com/p/Bjmc5EaH7xy/?taken-by=indiancricketteam
https://www.instagram.com/p/BjjUjuYHj53/?taken-by=indiancricketteam
बीसीसीआयच्या खेळाडूंना वर्षाकाठी मिळणाऱ्या कराराच्या नुसार देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या पुरूष खेळाडूंना जर तो संघात असेल ३५ हजार प्रत्येक दिवसासाठी, तर राखीव खेळाडूंना १७ हजार ५०० रुपये देण्यात येणार आहेत.
असे असूनही महिला आशिया चषकसारख्या मोठ्या स्पर्धेत सामनावीरासाठी इतकी कमी रक्कम दिली जात असल्याने चाहत्यांनी यावर नाराजगी व्यक्त केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
–२४ तासांतच विराट कोहलीसाठी चार मोठ्या गोड बातम्या
–संपुर्ण यादी- बीसीसीआयचे २०१७-१८सालचे पुरस्कार घोषीत, कोहलीसह मंधाना, हरमनप्रीत कौरचाही होणार गौरव
–फिफा विश्वचषक २०१८- ओळख ब गटाची
–वनडेत १३ हजारपेक्षा जास्त धावा करणारा क्रिकेटर आॅस्ट्रेलियाच्या मदतीला
–तामिल थलायवाजकडून कबड्डी अकादमी स्थापनेची घोषणा