---Advertisement---

विश्वचषकात मिताली राज भारताची कर्णधार ‘नंबर वन’! धोनी, अझरुद्दीन यांनाही टाकले मागे

On: शनिवार, मार्च 12, 2022 12:59 PM
Mithali-Raj
---Advertisement---

भारतीय महिला संघ न्यूझीलंडमध्ये महिला विश्वचषक खेळत आहे. शनिवारी (१२ मार्च) भारतीय महिला संघ आणि वेस्ट इंडीज महिला संघ यांच्यात आमना सामना झाला. भारताची अनुभवी कर्णधार मिताली राज याने या सामन्यासाठी मैदानात पाय टाकाताच मोठ्या विक्रमाची नोंद केली. आयसीसी महिला विश्वचषकात सर्वात जास्त सामन्यांमध्ये स्वतःच्या संघाचे नेतृत्व करण्याचा मान मितालीने मिळवला आहे.

मिताली राजसाठी (Mithali Raj) वेस्ट इंडीजविरुद्धचा हा सामना कर्णधाराच्या रूपातील महिला विश्वचकात (ICC Women’s World Cup 2022) खेळलेला २४ वा सामना होता. आता ती महिला विश्वचषकात सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करणारी कर्णधार बनली आहे.  यापूर्वी ऑस्ट्रेलियाची माजी महिला कर्णधार बेलिंडा क्लार्कच्या नावावर हा विक्रम होता, जिने २३ विश्वचषक सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व केले होते.

महिला विश्वचषकात मितालीने यापूर्वी नेतृत्व केलल्या २३ सामन्यांपैकी १४ मध्ये विजय मिळवला आहे, तर ८ सामन्यांमध्ये संघ पराभूत झाला आहे. विश्वचषक स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्व करण्याचा मानही मिताली राजच्याच नावावर झाला आहे. यापूर्वी माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीने यांनी सर्वाधिक २३ विश्वचषक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले होते. आता अजहरुद्दीन या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरले आहेत. एमएस धोनी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने १७ विश्वचषक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.

महिला विश्वचषाकात कर्णधाराच्या रूपात सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडू
२४ सामने – मिताली राज (भारत)
२३ सामने – बेलिंडा क्‍लार्क (ऑस्‍ट्रेलिया)
१९ सामने – सुसान गोटमॅन (इंग्‍लंड)

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व करणारे खेळाडू
२४ सामने – मिताली राज
२३ सामने – मोहम्‍मद अजहरुद्दीन
१७ सामने – एमएस धोनी
१५ सामने – कपिल देव

दरम्यान, महिला विश्वचषक २०२२ च्या पहिल्या दोन सामन्यांपैकी भारतीय संघाने एक जिंकला आहे, तर एकामध्ये पराभव पत्करला आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानला पराभूत केले, तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडने भारतावर मात केली. वेस्ट इंडीजविरुद्धचे यापूर्वीच प्रदर्शन पाहता भारताचे पारडे जड आहे.

भारत आणि वेस्ट इंडीज महिला संघांमध्ये यापूर्वी २५ एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत, ज्यापैकी २० भारताने, तर ५ वेस्ट इंडीजने जिंकले आहेत. विश्वचषकात हे संघ आतापर्यंत ६ वेळा आमने सामने आहे, त्यापैकी एकदाही वेस्ट इंडीजला विजय मिळवता आला नाही.

महत्वाच्या बातम्या –

केकेआरचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर; आता ऑस्ट्रेलियाच्या ‘या’ दिग्गज खेळाडूला केले ताफ्यात सामील

सलूनमध्ये काम करणाऱ्याच्या मुलाचा सोशल मीडियावर राडा; मिळाली थेट ‘मास्टर ब्लास्टर’सोबत प्रॅक्टिस करण्याची संधी

मोठी बातमी! आरसीबी संघ ‘या’ दिवशी करणार आपल्या नवीन कर्णधाराची घोषणा; वाचा सविस्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---