---Advertisement---

वाढदिवस विशेष। मितालीची ऐतिहासिक कामगिरी, बनली सचिननंतर ‘असा’ कारनामा करणारी पहिलीच क्रिकेटपटू

On: शनिवार, डिसेंबर 3, 2022 12:12 PM
---Advertisement---

सर्वकालीन महान भारतीय महिला क्रिकेटपटू व भारताच्या कसोटी, वनडे संघाची माजी कर्णधार असलेल्या मिताली राज हिचा आज (3 डिसेंबर) 40वा वाढदिवस आहे. ती दिग्गज भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याच्यानंतर 22 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी ती पहिली व एकमेव महिला खेळाडू (26 जून, 2022) ठरली.

यादिवशी केली होती आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला सुरूवात
मूळची राजस्थान येथील असलेल्या मिताली राज (Mithali Raj) हिने 26 जून 1999 रोजी आयर्लंड विरुद्ध वनडे सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. त्यानंतर ती 2022पर्यंत भारतीय संघाची नियमित सदस्य राहिली. मितालीने तिच्या कारकीर्दीत 12 कसोटी, 232 वनडे आणि 89 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

कसोटीत एक शतक आणि चार अर्धशतकांच्या मदतीने 699 धावा, 232 वनडे सामन्यात 7 शतके आणि 64 अर्धशतकांसह 7805 धावा आणि 89 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 17 अर्धशतकांसह एकूण 2364 धावा तिने केल्या आहेत. मिताली ही वनडे क्रिकेटमध्ये 6000 आणि 7000 धावा करणारी पहिली महिला क्रिकेटपटू. तिच्यानंतर महिला वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा इंग्लंडची माजी कर्णधार चार्लेट एडवर्डस (5992 धावा) हिने ठोकल्या आहेत.

सचिनच्या नावे सर्वात दिर्घ कारकीर्दीचा विक्रम
भारतासाठी सर्वात दीर्घ आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेट कारकीर्दीचा विक्रम सचिन तेंडुलकर याच्या नावे आहे. सचिनने 18 डिसेंबर 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध पदार्पण केले होते. सचिनने आपला अखेरचा वनडे सामनादेखील पाकिस्तानविरुद्धच खेळला. त्याची कारकीर्द 22 वर्ष 91 दिवसांची राहिली. तो तब्बल 24 वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! बांगलादेश दौऱ्याच्या वनडे मालिकेतून भारताच्या स्टार खेळाडूचा पत्ता कट, कसोटीला मुकणार का?
देशप्रेमापोटी मेजर ध्यानचंद यांनी नाकारली होती चक्क हिटलरची ऑफर; वाचा त्यांच्याबद्दलच्या रोमांचक गोष्टी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---