बुधवारी (दि. ०८ जून) भारतीय क्रिकेटविश्वातून मोठी बातमी समोर आली. भारतीय संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. तिच्या या निर्णयानंतर तिने सर्वांचे आभारही मानले. यानिमित्ताने आपण मितालीला तिच्या आयुष्यात मिळालेल्या खास पुरस्काराबद्दल जाणून घेऊया.
क्रीडा जगतात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल १३ नोव्हेंबर रोजी दिल्ली येथे खेळाडूंसाठी राष्ट्रीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात पहिल्यांदाच १२ खेळाडूंना देशातील सर्वोच्च क्रीडा सन्मान मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी दिग्गज महिला क्रिकेटपटू मिताली राज हिला देखील खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित होणारी पहिली महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने आशा व्यक्त केली की तिची कामगिरी देशातील तरुण मुलींना त्यांच्या स्वप्ने साकार करण्यास प्रेरित करेल.
भारतीय महिला क्रिकेटच्या या ३८ वर्षीय दिग्गज खेळाडूला राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते देशाच्या सर्वोच्च क्रीडा सन्मान खेलरत्नने सन्मानित करण्यात आले. यावर्षी हा पुरस्कार मिळालेल्या १२ खेळाडूंना देण्यात आला. मितालीने ट्विटरवर लिहिले की, “खेळात महिला या बदलाच्या शक्तिशाली उत्प्रेरक असतात आणि जेव्हा त्यांच्या कर्तृत्वाला कौतुक मिळते, तेव्हा ते इतर अनेक महिलांना त्यांचे स्वप्न साकार करण्यास बळ देते.”
भारतीय महिला कसोटी आणि एकदिवसीय संघाची कर्णधार म्हणाली, “मला मनापासून आशा आहे की माझा प्रवास देशभरातील तरुण मुलींना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी प्रेरणा देईल.” मितालीने २२० एकदिवसीय आणि ८९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
Truly honoured and grateful to receive the Major Dhyan Chand Khel Ratna Award 🙏 pic.twitter.com/79HZOV9Uox
— Mithali Raj (@M_Raj03) November 13, 2021
हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त हा समारंभ पारंपारिकपणे दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी आयोजित केला जातो. परंतु, यंदा त्यावेळी ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा सुरू होत्या. त्यामुळे ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यासाठी हा समारंभ पुढे ढकलण्यात आला. खेलरत्न पुरस्कारामध्ये २५ लाख रुपये रोख, पदक आणि सन्मानपत्र देण्यात येते. अर्जुन पुरस्कारामध्ये १५ लाख रुपये, एक कांस्य पुतळा आणि सन्मान प्रमाणपत्र देण्यात येते.
मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते: नीरज चोप्रा (ऍथलेटिक्स), रवी कुमार (कुस्ती), लोव्हलिना बोरगोहेन (बॉक्सिंग), पीआर श्रीजेश (हॉकी), अवनी लेखरा (पॅरा नेमबाजी), सुमित अंतिल (पॅरा ऍथलेटिक्स), प्रमोद भगत (पॅरा बॅडमिंटन), कृष्णा नगर (पॅरा बॅडमिंटन), मनीष नरवाल (पॅरा नेमबाजी), मिताली राज (क्रिकेट), सुनील छेत्री (फुटबॉल), मनप्रीत सिंग (हॉकी).
मिताली राजला मिळालेले पुरस्कार
अर्जुन पुरस्कार- २००३
पद्मश्री पुरस्कार- २०१५
मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार- २०२१
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
बिग ब्रेकिंग! भारताची दिग्गज क्रिकेटर मिताली राजचा क्रिकेटला गुडबाय
आज विराट नसता, तर ‘तो’ नक्कीच असता, वाचा सीएसकेच्या यशाच्या अनसंग हीरोबद्दल
धोनीने धावांचा पाऊस पाडणाऱ्या हेडनला ‘ती’ बॅट वापरण्यास केलेला विरोध, काय होती त्या बॅटची खासियत?