बुधवारी (दि. ०८ जून) भारतीय महिला संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने मोठा निर्णय घेत सर्वांनाच धक्का दिला. तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मितालीने तिच्या कारकीर्दीत अनेक मोठ्या विक्रमांवर आपले नाव कोरले आहे. त्यातील काही विक्रम हे कदाचित मोडणेही अशक्य आहेत. कोणते आहेत ते विक्रम, चला तर जाणून घेऊया…
रविवारी (०६ मार्च) पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK) यांच्यात आयसीसी महिला विश्वचषक २०२२ मधील (ICC Women ODI World Cup) चौथा सामना झाला. भारतीय संघाचा हा विश्वचषकातील पहिलाच सामना होता. या सामन्यासाठी मैदानात पाऊल ठेवताच भारताच्या वनडे संघाची कर्णधार मिताली राज (Mithali Raj) हिने मोठा विक्रम तिच्या नावावर केला आहे.
सर्वात वयस्क कर्णधार
मिताली आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउंसिलच्या (आयसीसी) महिला आणि पुरुषांच्या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्त्व करणारी सर्वात वयस्कर कर्णधार (Oldest Indian Captain Playing In ICC Tournament) बनली होती. त्यावेळी तिचे वय ३९ वर्षे ९३ दिवस इतके होते. तिच्यापूर्वी डायना एडुलजी यांच्या नावावर हा विक्रम होता. त्यांनी १००९ सालच्या महिला वनडे विश्वचषकात भारतीय संघाच्या नेतृत्त्वाची कमान सांभाळली होती. तेव्हा त्यांचे वय ३७ वर्षे १८४ दिवस इतके होते.
मिताली राजने पाकिस्तानविरुद्ध केला विश्वविक्रम
याखेरीज मिताली ही सर्वाधिक विश्वचषक खेळणारी पहिलीच महिला भारतीय खेळाडूही ठरली आहे. मिताली मागच्या मोठ्या काळापासून भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. यावर्षी खेळला जाणारा विश्वचषक तिच्या कारकिर्दीतील ६ वा विश्वचषक आहे. यापूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये फक्त दोन खेळाडू असे होऊन गेले आहेत, ज्यांनी कारकिर्दीत ६ विश्वचषकांमध्ये राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये पाकिस्तान संघाचे दिग्गज जावेद मियाँदाद (Javed Miandad) आणि भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांचा समावेश आहे.
हेही वाचा- राजेश्वरीचे ‘राज’! महिला विश्वचषकात अशी कामगिरी करणारी बनली एकमेव गोलंदाज
मितालीने अबाधित राखला पाकिस्तानविरुद्धचा १०० टक्के विजयाचा विक्रम
भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, भारताने १०७ धावांनी हा सामना जिंकला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत ७ विकेट्सच्या नुकसानावर २४४ धावा केल्या होत्या. यामध्ये सलामीवीर स्म्रीती मंधाना (५२ धावा), स्नेह राना (नाबाद ५३ धावा) आणि पूजा वस्त्राकार (६७ धावा) यांच्या अर्धशतकी खेळींचा समावेश होता.
भारताच्या २४५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ १३७ धावांवरच गारद झाला. पाकिस्तानच्या इतक्या कमी धावसंख्येवर रोखण्यात भारताच्या राजेश्वरी गायकवाडने मोठी भूमिका बजावली. तिने या डावात केवळ ३१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या होत्या. अशाप्रकारे हा सामना जिंकत भारतीय संघाने पाकिस्तानवरील १०० टक्के विजयाचा विक्रम कायम राखलेला. भारताने पाकिस्तानविरुद्ध आतापर्यंत ११ वनडे सामने खेळले आहेत. यापैकी ११ ही सामने भारतानेच जिंकले आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या मितालीने पटकावलेत ‘हे’ पुरस्कार, टाका एक नजर
बिग ब्रेकिंग! भारताची दिग्गज क्रिकेटर मिताली राजचा क्रिकेटला गुडबाय
आज विराट नसता, तर ‘तो’ नक्कीच असता, वाचा सीएसकेच्या यशाच्या अनसंग हीरोबद्दल